Healthy lifestyle: आहारामध्ये करा हे बदल, आजारांपासून सुटका मिळवा अन् घ्या निरोगी जीवनाचा आनंद

चांगले आरोग्य हिच खरी संपत्ती असते.
health
healthsakal
Updated on

चांगले आरोग्य हिचं खरी संपत्ती असते. त्यामुळेच ‘आरोग्य धनसंपदा’ असे आरोग्याच्या बाबतीत म्हंटले जाते. मात्र आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगात सर्वांचेच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास पैसा, संपत्ती मिळवण्याच्या हव्यासापोटी आपण आपले आरोग्य पणाला लावत आहोत.

आपले आरोग्य सुदृढ राहावे आणि आपण आनंदी जीवन जगावे, असे प्रत्येकालाच वाटते. मात्र, आपली जीवनशैली आणि आहारावरून आपण एका सुदृढ आरोग्याकडे वाटचाल करत आहोत, असे वाटत नाही. आजार आणि आरोग्यसंबंधी विविध समस्या आपल्या जीवनाचा भाग बनल्या आहेत.

मात्र, आपल्या आजारांना दूर करण्यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न केले तर निरोगी आणि आनंदी जीवनाचा आपण आनंद घेऊ शकतो. त्यासाठी आपल्या आहार आणि जीवनशैलीमध्ये आपल्याला काही बदल करावे लागतील. त्यासाठीच आज आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत.

health
Homemade Facial Scrub: घरबसल्या पार्लरसारखा ग्लो हवा आहे? मग या होममेड स्क्रबचा करा वापर

आहारामध्ये तूप घ्या


तुपामुळे फॅट वाढतेय, असे अनेकजण म्हणतात. मात्र, फॅट दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे चांगले आणि दुसरे वाईट. त्यामुळे तुम्ही चांगल्या फॅटचा आहारामध्ये समावेश करायला विसरू नका. दररोज एक चमचा तूप आहारामध्ये घेतल्यास आपली रोगप्रतिकार शक्ती अधिक मजबूत बनते. तसेच पाचनशक्ती सुधारण्यासाठी मदत होते. ज्यांना मासिक पाळीचा त्रास असेल त्यांच्यासाठी देखील तूप फायदेशीर आहे. 

फायबरचे प्रमाण वाढवा


फायबर देखील एक कार्बोहायड्रेट आहे. शरीर काही प्रकारच्या फायबर तोडून ऊर्जेच्या स्वरुपात वापर करतो. त्यामुळे ब्रोकोली, बीन्स, अॅवाकॅडो, सफरचंद यांचा आहारामध्ये समावेश करायला पाहिजे.

हेल्दी भाज्या आणि फळे


पौष्टीक आहारामध्ये भाज्या आणि फळे घ्यायला विसरू नका. त्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. त्यामुळे अनेक आजारांपासून सुटका मिळण्यास मदत होते. दररोज भाज्या आणि फळांचे सेवन केल्यास ब्लड प्रेशर कमी करण्यास तसेच पचनसंस्थेशी निगडीत आजारांपासून आराम मिळतो.

health
Parenting Tips: मुलांना घरी एकटं सोडताय? लक्षात ठेवा या गोष्टी, येणार नाही कोणतीही अडचण

तेलकट मासे


तुम्ही मांसाहारी असाल तर माशांचं सेवन करा. यामध्ये सैल्मन, मैकेरल आणि सार्डीन या माशांमुळे हृदयरोग, प्रोटेस्ट कँसर, डोळ्याची हानी आणि मनोभ्रंश याविरोधात मदत करतात. यामध्ये व्हिटॅमिन डी, प्रोटीन, व्हिटॅमिन बी आणि सेलेनियमचे प्रमाण असते. तसेच ओमेगा ३ फॅटी अँसिडचा देखील हा चांगला स्त्रोत आहे.

साखरेचे सेवन कमी करा


साखर, डेक्स्ट्रोज आणि उच्च फ्रुक्ट्रोजचे सेवन कमी करा. त्यामुळे पाचनसंस्थेवर परिणाम होतो. तसेच नैसग्रिक गोड असलेले गुड, स्टीविया, मेपल सिरप आदींचा वापर करा.

हर्बल चहा


हिरव्या चहापासून हिबिस्कसपर्यं, पांढऱ्या चहापासून कैमोमाइलपर्यंत फ्लेवोनोइड्स आणि अन्य चांगल्या घटकांचा समावेश असतो. हर्बल चहामध्ये असणारे पुदीना, कैमोमाइल, रूइबोस कॅफीनमुक्त असतात. त्यामुळे संपूर्ण दिवस हायड्रेट ठेवण्याचे काम करते. तसेच ग्रीन टी आणि हर्बल टी सारख्या पर्यायांसोबत दुधाचा चहा, कॉफी सोडल्यास तुम्हाला चांगला फरक जाणवेल.

जंक फूड टाळा


जंक फूडमध्ये फॅटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे लठ्ठपणा वाढतो. तसेच शरीराला सुस्तपाणा येतो. शरीर कमजोर देखील बनते. तुम्हाला कुठलाही आजारा नसेल तर तुम्ही जंक आणि प्रोसेस्ड फूड खाऊ नका. आयुष्यात कुठलाही आजारा तुम्हाला होणार नाही. तसेच तुम्हाला आजार असेल तर जंक फूड खाणे सर्वात धोकादायक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.