Cancer Prevention: कर्करोगापासून वाचायचंय? मग या व्हिटॅमिन्सचा आहारात समावेश करा

कर्करोगासारख्या घातक आजाराने दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो.
Cancer
Cancer sakal
Updated on

कर्करोगासारख्या घातक आजाराने दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. आरोग्य तज्ञ नेहमी लोकांना त्याची सुरुवातीची लक्षणे आणि उपचार करून घेण्यास सांगतात.

याशिवाय कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी लोकांना आरोग्यदायी अन्न खाण्यासोबतच धूम्रपान आणि मद्यपानापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

आज आम्ही तुम्हाला त्या व्हिटॅमिन्सबद्दल सांगू, जे तुम्हाला कर्करोगापासून वाचवण्यास मदत करतील. या जीवनसत्त्वांचा रोजच्या आहारात समावेश करून तुम्ही कर्करोगाचा धोका टाळू शकता.

व्हिटॅमिन ए, सी आणि ई

हे जीवनसत्त्वे अँटिऑक्सिडंट्स आहेत, जे मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून पेशींचे संरक्षण करण्यास मदत करतात. मुक्त रॅडिकल्स शरीरात कर्करोगाच्या विकासास प्रोत्साहन देतात.

व्हिटॅमिन सी आणि ई मध्ये कार्सिनोजेनेसिस रोखण्याची क्षमता आहे. हे कार्सिनोजेन-प्रेरित डीएनएचे नुकसान रोखण्यासाठी ओळखले जातात. ही तिन्ही जीवनसत्त्वे लिंबूवर्गीय फळे, गाजर, पालक, ब्रोकोली आणि नट्समध्ये आढळतात.

Cancer
Thunderstorm Asthma : धुळीच्या वादळामुळे उद्भवतो थंडरस्टॉर्म अस्थमाचा धोका, जाणून घ्या नेमकी काय आहे ही समस्या

व्हिटॅमिन के

व्हिटॅमिन के रक्त गोठण्याची समस्या टाळते. अभ्यासानुसार, व्हिटॅमिन के कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करू शकते. पालकसारख्या हिरव्या पालेभाज्या व्हिटॅमिन केचे चांगले स्रोत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.