Thunderstorm Asthma : धुळीच्या वादळामुळे उद्भवतो थंडरस्टॉर्म अस्थमाचा धोका, जाणून घ्या नेमकी काय आहे ही समस्या

पावसामुळे दम्याचा त्रास होणाऱ्या व्यक्तींना श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात किंवा दम्याचा झटकाही येऊ शकतो.
Thunderstorm Asthma
Thunderstorm AsthmaSakal
Updated on

Precautions For Asthma : अंगाची लाही लाही करणारा कडक उन्हाळा संपून आता पावसाचे दिवस सुरू झाल्याने देशवासीय सुटकेचा निःश्वास टाकत आहेत. मात्र हवामानातील बदलामुळे दम्याची समस्या असलेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आणि यामुळे जाणवणारी लक्षणे अधिक तीव्र स्वरुप गाठतात. 

पावसामुळे दम्याचा त्रास होणाऱ्या व्यक्तींना श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात किंवा दम्याचा झटकाही येऊ शकतो. वादळवारे आणि दमा यांच्या परस्परसंबंध असल्याचं एका संशोधनातही आढळले आहे. यातूनच ‘थंडरस्टॉर्म अस्थमा’ या प्रकाराची माहिती समोर आली. पावसाळ्यात होणाऱ्या दम्याची समस्या समजून घेण्यासाठी आणि आरोग्यास अपाय होऊ नये, म्हणून या ऋतूमध्ये श्वसनाचे आरोग्य उत्तम राखणे अत्यावश्यक आहे.

Thunderstorm Asthma
Asthma : महिलांनी असं मिळवा दम्यावर नियंत्रण; लिंगानुरुप लक्षणांनुसार दमा व्यवस्थापनाच्या टिप्स

अ‍ॅलर्जीला कारणीभूत ठरणारे काही ऋतू-विशिष्ट प्रतिजन असतात. वैद्यकीय भाषेत यास अ‍ॅलर्जन्स असेही म्हणतात. असे काही अ‍ॅलर्जन्स पावसाळ्यात अस्तित्वात असतात आणि त्यामुळे अस्थमाची लक्षणे अधिक तीव्र होतात. हे अ‍ॅलर्जन्स पुढीलप्रमाणे –

Thunderstorm Asthma
Teenage Asthma : मुलं उशिरा झोपतात ? मग किशोरवयातच होऊ शकतो दमा
  • तापमान कमी करणारी थंड हवा, त्यामुळे श्वसनमार्गातील हिस्टेमाइन मोकळा होण्यास उत्तेजन मिळते आणि श्वास घेताना-सोडताना घरघरण्याची समस्या उद्भवते व अस्थमाची अन्य लक्षणे जाणवू लागतात. 

  • परागकणांचे अस्तित्व पावसाळ्यात वाढते. 

Thunderstorm Asthma
Childhood Asthma : तुमच्या मुलांना दमा आहे हे कसं ओळखाल ? काय काळजी घ्याल ?
  • पावसाळ्यात अतिरिक्त ओलसरपणा व बुरशी आढळते. त्यामुळे त्रासदायक घटक व विषारी द्रव्ये निर्माण होतात आणि शिंका येणे, घरघर लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे आदी लक्षणे जाणवू लागतात. 

पावसाळ्याच्या ऋतूत दम्याची समस्या नियंत्रणात राहावी, यासाठी हे करा उपाय

  • चार भिंतींच्या आतील (इनडोअर) जागांमध्ये वायूव्हिजन उत्तर राखा, बुरशी वगैरेंची वाढ टाळण्याच्या दृष्टीने, आर्द्रतेचा स्तर नियंत्रणात राहील याची काळजी घ्या. 

  • धुळीतून येणाऱ्या जीवजंतूंचे प्रमाण कमीत-कमी राहावे म्हणून नियमितपणे साफसफाई करा, व्हॅक्युम क्लीनरचा वापर करून स्वच्छता ठेवा. 

  • विषाणूजन्य प्रादुर्भावही पावसाळ्यात अधिक प्रचलित असतात. हात वारंवार धुवा, आजारी व्यक्तींच्या जवळ जाणे टाळा आणि अस्थमाच्या झटक्यांचे कारण ठरणाऱ्या प्रादुर्भावांचा धोका कमी करण्यासाठी श्वसनमार्गातील विषाणूंपासून संरक्षण देणाऱ्या लस घेण्याबाबत विचार करा. 

  • हवेच्या दर्जावर लक्ष ठेवा आणि प्रदूषित भागांमध्ये जाणे टाळा. दिलेली औषधे काटेकोरपणे घेत राहा आणि अस्थमा कृती योजना अद्ययावत ठेवा.

  • श्वसनाचे आरोग्य सुधारणाऱ्या कृती करा. उदाहरणार्थ, नियमित व्यायाम करणे, समतोल आहार घेणे.

  • या प्रतिबंधात्मक उपायांशिवाय, डॉक्टरांनी सुचवलेले उपचार करावे.   

  • डॉक्टरांनी सांगितल्यानुसार इन्हेलरचा नियमित वापर केल्यामुळे रुग्णाला लक्षणांवर त्वरित नियंत्रण मिळवता येते, आजार बळावणे टाळता येते आणि हे उपकरण सर्व वयोगटातील रुग्ण वापरू शकतात. 

  • शिवाय, पीक फ्लो मीटर हे हाताने वापरण्याजोगे उपकरण, रुग्णाला श्वास सोडताना फुप्फुसांतून किती जोराने हवा बाहेर टाकता येत आहे याचे मापन करते. हे उपकरण अस्थमाच्या रुग्णांनी जवळ ठेवावे. कारण, फुफ्फुसांचे कार्य किती दमदार आहे आणि श्वासमार्ग कितपट खुला आहे हे या उपकरणाद्वारे तपासता येते.

  • अस्थमाचा व्यक्तीच्या आयुष्याच्या दर्जावर नकारात्मक परिणाच होतोच असे नाही. झटपट आराम मिळवण्यासाठी इन्हेलर्सची उपलब्धता आणि डॉक्टरांकडे त्वरित जाण्याची सोय असेल, तर अस्थमाचे व्यवस्थापन प्रभावीरित्या करता येते. 

  • दैनंदिन कामांमध्ये अस्थामाची अडचण जाणवत नाही. जागरूकता व शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून रुग्णांना अस्थमाची लक्षणे ओळखण्याची व आवश्यक ते उपचार घेण्याची क्षमता दिली गेली पाहिजे.

- डॉ. पराग खटावकर, कन्सल्टिंग चेस्ट फिजिशियन, पुणे

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठीआणि जागरूकतेसाठी आहे. ही माहिती कोणत्याही उत्पादनाचा प्रचार, वापर किंवा समर्थन करण्यासाठी किंवा औषधांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी नाही. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.