तुम्हीही पाकिटबंद पदार्थ खाताय? वेळीच व्हा सावध, अन्यथा आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

खाण्यापिण्याच्या सवयींमुळेही आपल्या आरोग्यावर चांगले-वाईट परिणाम होत असतात. तुम्हीही प्लास्टिक किंवा कागदात बांधलेले पदार्थ खाताय का? मग ही माहिती नक्की वाचा…
Packed Food and Health In Marathi
Packed Food and Health In MarathiSakal
Updated on

Health News : निरोगी आरोग्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयी, वेळा, पौष्टिक आहार या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. कारण खाण्यापिण्यातील बदलांमुळे आपल्या शरीरावर कोणकोणते परिणाम होऊ शकतात, हे आपणास कळतही नाहीत. आयुष्याच्या व्यस्त वेळापत्रकामुळे बहुतांश मंडळी ‘रेडी टू इट’ किंवा रेस्टॉरंटमधील पदार्थांवर ताव मारतात. 

नाश्ता करण्यासाठी, जेवण करण्यासाठी वेळच नसल्याने लोक पॅक्ड फूडचा (side effects of eating processed foods) आधार घेताहेत. पण यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहेत, हे तुमच्या लक्षात येतंय का? 

प्लास्टिक किंवा कागदामध्ये पॅक केलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्यावर कोणकोणते दुष्परिणाम होतात ? जाणून घेऊया सविस्तर…

पाकिटबंद पदार्थांमुळे आरोग्यावर होणारे नुकसान

पाकिटबंद पदार्थ दीर्घकाळ टिकून राहावेत, यासाठी त्यावर प्रक्रिया केलेली असते. कित्येक भाज्या, सूप तसेच खाद्यपदार्थांमध्ये सोडिअमचा अधिक प्रमाणात वापर केला जातो. हे पदार्थ ताजे नसल्याने त्यामध्ये पोषणतत्त्वांचीही कमतरता असते. शिवाय यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक असते.  

Packed Food and Health In Marathi
Health Care Tips रात्री या तीन पावडरचे सेवन केल्यास आरोग्यास मिळतील जबरदस्त फायदे

अधिक प्रमाणात मीठ असलेले, पाकिटबंद- रेडी टू इट खाद्यपदार्थ, चिप्स इत्यादी खाद्यपदार्थ टाळावे.

Packed Food and Health In Marathi
Health Tips : आरोग्यासाठी दूध चांगलं पण ते कशासोबतही खाऊ नका, दूध आवडतं तर हे नियमही जाणून घ्या

या आजारांचा निर्माण होऊ शकतो धोका 

  • वजन वाढणे

  • मधुमेह

  • हृदयविकार

  • स्वादुपिंडाचा कर्करोग होण्याचा धोका 

Packed Food and Health In Marathi
Lungs Health: 'या' भाज्यांमुळे फुफ्फुस होईल निरोगी, श्वसनाचे आजार होतील दूर

पाकिटबंद पदार्थांमध्ये पोषकघटकांचा असतो अभाव

पाकिटबंद पदार्थांमध्ये पोषणतत्त्वांची कमतरता असते. एखाद्या पदार्थामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन,फॅट्स योग्य प्रमाणात असणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत जर आपण पोषणतत्त्वांची कमतरता असणाऱ्या पदार्थांचे सेवन केले तर वेगवेगळ्या आजारांची लागण होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.