Health Care News : ओठांवर वारंवार येतो घाम? काय असू शकतं कारण? जाणून घ्या उपाय

ओठांवर वारंवार येतो घाम? काय असू शकतं कारण?
health
healthsakal
Updated on

शरीराला घाम येणं ही खरं तर सामान्य बाब आहे. परंतु चेहऱ्याच्या काही भागांवर जास्त घाम येणे ही एक समस्या आहे, जसे की काही लोकांच्या ओठांच्या वर अनेकदा घाम येतो. अशा स्थितीत घाम वारंवार पुसल्याने त्या ठिकाणची त्वचा काळी पडते, तर मेकअप केला असल्यास ती खराब दिसू लागते. आज आम्ही तुम्हाला याचे कारण तसेच या समस्येला तोंड देण्यासाठी उपाय सांगणार आहोत.

जास्त घाम आल्याने ही समस्या उद्भवू शकते

उष्ण हवामानामुळे किंवा शारीरिक हालचालींमुळे शरीराचे तापमान वाढले की घाम येणे सामान्य आहे. शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी शरीरातून घाम येणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु सामान्य हवामानात, फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी न करताही जास्त घाम येणे ही एक आरोग्य समस्या आहे, ज्याला वैद्यकीय परिभाषेत हायपरहायड्रोसिस म्हणतात.

अति घाम येण्यामागे हायपरहाइड्रोसिससारख्या समस्यांसोबतच इतरही काही कारणे असू शकतात. उदाहरणार्थ, कधीकधी तणाव, औषधे आणि अल्कोहोलचे अतिसेवन तसेच धूम्रपान हे देखील त्याचे कारण बनते. याशिवाय लठ्ठपणा, मधुमेह आणि रक्तदाब यांसारख्या समस्यांमुळेही लोकांना जास्त घाम येतो.

health
Health Care News : हृदय निरोगी ठेवायचं असेल तर, सकाळी 'या' पेयांनी दिवसाची सुरुवात करा

ओठांवर जास्त घाम का येतो?

आपण ओठांच्या वरच्या भागावर जास्त घाम का येतो याबद्दल बोलूया, तर आम्ही तुम्हाला सांगतो की ही समस्या चेहऱ्याच्या या भागात घर्म ग्रंथी (Sweat Glands) सक्रिय झाल्यामुळे उद्भवते.

हे उपाय करून बघा

शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला मसालेदार अन्नापासून दूर राहावे लागेल. अन्नामध्ये मिठाचा वापरही मर्यादित ठेवावा लागेल, ज्यामुळे शरीरातील सोडियमची पातळी नियंत्रित राहते.

यासोबतच शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी पाण्यासोबत ज्यूस, ताक, लस्सी यासारख्या पेयांचे सेवन सुरू करावे. त्याचबरोबर तणावामुळे काही लोकांना जास्त घाम येण्याची समस्या भेडसावते, हे टाळण्यासाठी मानसिक ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

घरातून बाहेर पडण्यापूर्वी, ओठांवर बर्फाचे तुकडे लावा, यामुळे घर्म ग्रंथीची क्रिया कमी होईल आणि घाम येणे कमी होईल.

तुम्ही बटाट्याचा रस ओठांच्या वरच्या भागावरही लावू शकता, यामुळे घाम येण्यापासून तसेच घामामुळे त्वचेचा रंग खराब होण्यापासून बचाव होईल.

काकडीचा रस ओठांच्या वर लावल्यानेही घाम येणे कमी होण्यास मदत होते.

तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये स्किन टोनिंगचा समावेश नक्की करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.