Health: व्हिटॅमिन D ची कमतरता जाणवतीय? तर करा 'या' पदार्थांचे सेवन

जेव्हा आपली त्वचा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येते तेव्हा व्हिटॅमिन डी हे शरीराद्वारे तयार केले जाते. पण सध्याचं सिमेंट काँक्रिटीकरणाचं जग पाहता बहुतांश लोकांना व्हिटॅमिन डी कमतरता निर्माण होण्याची समस्या अधिक वाढली आहे.
health care Which foods are high in vitamin D
health care Which foods are high in vitamin D
Updated on

व्हिटॅमिन डी एक चरबी-विरघळणारे जीवनसत्व आहे, जे हाडे आणि दातांचे चांगले आरोग्य राखते तसेच रोगप्रतिकारक, मेंदू आणि मज्जासंस्थेच्या कार्यास सपोर्ट करते. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, अपार्टमेंटच्या जगात सुर्यप्रकाश मिळतचं नसेल तर व्हिटॅमिन डीची कमतरता कशी भरुन काढायची.

health care Which foods are high in vitamin D
Health: पावसाळ्यात 'या' भाज्यांपासून सावध रहा

डायटिशियन पूनम दुनेजा यांनी एका वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, व्हिटॅमिन डी मिळविण्यासाठी, रोजच्या आहारात बदल करणं गरजेचं आहे. ट्राउट, सॅल्मन, ट्यूना आणि मॅकरेल सारख्या चरबीयुक्त माशांचा रोजच्या आहारा समावेश करू शकता.

फिश ऑइलचे सेवन करणे देखील फायदेशीर ठरू शकते. अंडी, मशरूम आणि चीजमध्ये काही प्रमाणात व्हिटॅमिन डी असते. जे लोक मांसाहारी आहेत त्यांनी या पदार्थांचा आहारामध्ये समावेश केल्यानं त्यांनी व्हिटॅमिन डीची कमतरता भासणार नाही.

health care Which foods are high in vitamin D
Health Care News : वजन कमी करण्यासाठी रोज प्या जिऱ्याचे पाणी; पोटाची चरबी झपाट्याने कमी होईल!

तसेच जे लोक मांसाहार करत नाही त्या लोकांनी गायीचे दुध, प्लॉंड बेस्ट मिल्क, संत्र्याचा ज्यूस, दही यांसारख्या पदार्थांचे सेवन करने फायद्याचे ठरेल. हे या पदार्थांचे सेवन करुनही तुम्हाला व्हिटॅमिन डीची कमतरता भासत असल्याच तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सप्लीमेंट घेऊ शकता. यामध्ये व्हिटॅमिन डी मोठ्या प्रमाणात असतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.