Vitamin C Side Effects: व्हिटॅमिन सीचे अति सेवनही ठरू शकते हानिकारक, वाचा दुष्परिणाम

व्हिटॅमिन सी आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे.
Vitamin C
Vitamin C sakal
Updated on

व्हिटॅमिन सी आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. हे पोषक घटक केवळ रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करत नाही तर त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यास देखील मदत करते. पण या व्हिटॅमिनच्या फायद्यांमुळे अति सेवन करू नका.

कारण, जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी शरीरासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे किडनी आणि हाडांचा त्रास होऊ शकतो. व्हिटॅमिन सी किती जास्त प्रमाणात घेऊ नये हे जाणून घेऊया.

जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी घेण्याचे तोटे

व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात घेतल्यास शरीरावर काही दुष्परिणाम दिसू लागतात. जर खाली दिलेली लक्षणे तुमच्या शरीरात दिसू लागली तर व्हिटॅमिन सी समृद्ध फळे आणि पदार्थांपासून दूर राहणे चांगले.

Vitamin C
Remedies for Dry-Frizzy Hairs : कोरड्या केसांमुळे त्रस्त आहात? मग ‘या’ घरगुती उपायांची घ्या मदत

1. किडनी स्टोनची समस्या

जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी अन्न किंवा सप्लीमेंट घेतल्यास किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतो. कारण शरीर ऑक्सलेटच्या रूपात अतिरिक्त व्हिटॅमिन सी मूत्राद्वारे बाहेर टाकते. परंतु, काहीवेळा ते इतर खनिजांसह एकत्रित होते आणि लहान क्रिस्टलचे रूप धारण करते आणि किडनी स्टोन बनते.

2. पचन समस्या

जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी घेण्याचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे खराब पचन. यामुळे तुम्हाला अपचन, उलट्या, पोटदुखी, छातीत जळजळ अशा समस्या होऊ लागतात. व्हिटॅमिन सी सप्लिमेंट घेणे थांबवून तुम्ही या समस्यांपासून आराम मिळवू शकता

3. शरीरात असंतुलित पोषण

व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात घेतल्याने शरीरातील पोषक तत्वांची पातळी असंतुलित होते. यामुळे शरीरातील व्हिटॅमिन बी 12 आणि कॉपरचे प्रमाण कमी होऊ शकते. त्याच वेळी, व्हिटॅमिन सीमुळे, शरीरात लोहाचे सेवन वाढते जे आरोग्यासाठी चांगले नाही.

शरीर स्वतःहून व्हिटॅमिन सी तयार करू शकत नाही. त्यामुळे या पोषकतत्त्वाची कमतरता टाळण्यासाठी व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ किंवा सप्लीमेंट्स घ्यावे लागते. साधारणपणे व्हिटॅमिन सीची पातळी अन्नपदार्थ खाल्ल्याने वाढत नाही, सप्लिमेंट्स हे यामागचे प्रमुख कारण आहे. त्याच वेळी, जे लोक धूम्रपान करतात आणि गर्भवती महिलांना सामान्यपेक्षा जास्त व्हिटॅमिन सीची आवश्यकता असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.