Health Care : डासांमुळे त्रस्त आहात? मग,'या' घरगुती उपायांच्या मदतीने डासांना पळवा

Health Care : पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचते. यामुळे डासांचे प्रजनन मोठ्या प्रमाणावर होते.
Health Care
Health Careesakal
Updated on

Health Care : पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचते. यामुळे डासांचे प्रजनन मोठ्या प्रमाणावर होते. परिणामी डास चावल्यामुळे डेंगी, हिवताप (मलेरिया), चिकनगुनिया या आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. यावर खबरदारीचा उपाय म्हणून डास घरात येणारच नाही, यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

त्यासाठी आयुर्वेद तज्ज्ञांनी काही सोपे घरघुती उपचार सांगितले आहेत. या उपायांतून डास घरात येणार नाही आणि घरातील डास बाहेर जातील. यामुळे डासांच्या दंशापासून बचाव होईल आणि संसर्गरोगही टाळता येतील.

Health Care
Collagen Rich Foods : आहारात 'या' कोलेजनयुक्त पदार्थांचा करा समावेश, वाढत्या वयाबरोबर तुमची त्वचा राहील तरूण.!

कापराचा धूर

  • घरात कापूर जाळल्यास कीटक, डास पळून जातात.

  • कापराच्या दोन वड्या जाळाव्यात

  • कापूर जाळताना खोली थोडा वेळ बंद ठेवावी

  • कापराच्या गंधाने डास बाहेर पळतात.

लसूण पेस्ट

  • लसणाची पेस्ट असेल तेथे डास येत नाही

  • डास जास्त असतील तर लसणाची पेस्ट कोपऱ्यात ठेवावी

  • लसूणाच्या उग्र वासाने डास बाहेर पडतात.

कडूलिंबाचा धूर

  • कडूलिंबाच्या हिरव्या पानांचा धूर करावा

  • ही पाने पूर्ण जळत नसून धूर होतो.

  • यामुळे घरातील डास लगेच बाहेर पडतात

Health Care
Zika Virus: झिका व्हायरसचा वाढतोय प्रसार, घरात 'ही' रोप लावल्यास डास राहतील दूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.