विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी प्रशासनाने हजारो अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या अधिकारी-कर्मचाऱ्यांना तातडीची आरोग्य सुविधा महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत दिली जात आहे. महापालिका हद्दीतील चार विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करण्यात आले आहेत. गेल्या तीन दिवसांत या कक्षामार्फत २४८ जणांची तपासणी करण्यात आली. कोणाला थकवा जाणवल्याची तर कोणाचा बीपी वाढल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले.