Health : मधुमेहींनी यंदा नवरात्रीला उपवास करताना घ्यावयाची काळजी
देशभरात नवरात्री सण उत्साहात साजरा केला जातो आणि या सणादरम्यान मेजवानीचा आस्वाद घेण्यासोबत उपवास देखील केला जातो. या शुभ सणाच्या नऊ रात्री भारतीय लोक उपवास करतात. साबुदाणा खिचडी, फ्रूट चाट, खीर ते कुट्टू की पूरी व आलू कढी यांसह तोंडाला पाणी आणणारे अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात. मर्यादित उपवास प्रौढांच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते.
यामुळे पचनसंस्थेला आराम मिळण्यासोबत शरीर डिटॉक्सिफाय होण्यास मदत होते. पण सलग ९ ते १० दिवस उपवास व कमी प्रमाणात आहार सेवन केल्याने व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. विशेषत: व्यक्तीला मधुमेह असेल आणि सेवन केले जाणा-या आहाराबाबत योग्य काळजी घेतली नाही तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
इंदोर येथील टोटल डायबिटीस हार्मोन इन्स्टिट्यूटचे एण्डोक्रिनोलॉजिस्ट डॉ. सुनिल एम. जैन म्हणाले, ‘’नवरात्री उपवासादरम्यान खाण्याच्या पद्धतीमध्ये बदल, उपवासाचे स्वरूप आणि सेवन न करण्यास सांगण्यात आलेले खाद्यपदार्थ सेवन करण्याच्या कारणामुळे मधुमेह व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे.
मधुमेह असलेल्या लोकांनी रक्तातील ग्लुकोजची इष्टतम पातळी राखण्यासाठी नियमित कालावधीनंतर खाणे आवश्यक आहे आणि उपवास सुरू करण्यापूर्वी कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खाणे आवश्यक आहे. दिवसभरात काही वेळा रक्तातील ग्लुकोजची पातळी तपासणे महत्त्वाचे आहे. आज ग्लुकोज मॉनिटरिंग डिवाईस आहेत, जे सहज उपलब्ध आहेत आणि त्यामधून कोणताही त्रास होत नाही.
हे डिवाईस रिअल-टाइम ग्लुकोजचे परिणाम दाखवतात आणि ग्लुकोजची पातळी कोठे जात आहे हे दर्शविणारा दिशात्मक ट्रेंड अॅरो दाखवतात, जे व्यक्तीला माहितीपूर्ण आहाराचे निर्णय घेण्यास मदत करतात.”उपवासानंतर मेजवानीचा आस्वाद घेतल्यास मधुमेह व्यवस्थापन जटिल होऊ शकते. म्हणूनच आरोग्यदायी राहण्यासोबत सण साजरीकरणाचा आनंद घेण्यासाठी काही टिप्स पुढीलप्रमाणे.
योग्य आहार सेवन करा - आहारातील निर्बंध आणि बदललेल्या आहार पद्धतींमुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी-जास्त होण्याची शक्यता असते. म्हणून, उपवासाच्या योजनेबद्दल तुमच्या डॉक्टरांशी बोलणे महत्त्वाचे आहे, ज्यामध्ये उपवासाच्या दिवसांची संख्या, खाण्याचे प्रमाण व वेळा आणि खाऊ शकणारे पदार्थ यांचा समावेश असावा.
कारण यामुळे ग्लुकोजच्या चढ-उतारांचे नियमन करण्यास आणि एकूण आरोग्याला चालना मिळण्यास मदत होईल. व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स, प्रथिने आणि फायबर समृध्द अन्नपदार्थांचे सेवन करू शकता, जे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात.
भाजलेले मखना, नट आणि भोपळ्याच्या कटलेटचे सेवन उपवासाच्या वेळी चांगले स्नॅक असण्यासोबत प्रथिनांची आवश्यकता देखील पूर्ण करतात. याव्यतिरिक्त, व्हिटॅमिन सी आणि फायबर-समृद्ध फळे जसे संत्री आणि किवी सेवनासाठी चांगली आहेत. ते शरीरातील इन्सुलिन चढ-उतारावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात
रक्तातील ग्लुकोज पातळीवर देखरेख ठेवा - उपवास करताना तुमच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी कधी तपासायची हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. घरामध्ये ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टिम ठेवल्याने तुम्हाला तुमची ग्लुकोजची पातळी वेळोवेळी तपासण्यास मदत होईल.
आज फ्रीस्टाइल लिब्रे सारखे सेन्सर-आधारित डिवाईस आहेत, जे कृतीत आणण्यायोग्य ट्रेंड व नमुने देतात आणि तुम्हाला तुमच्या आरोग्याविषयी चांगले निर्णय घेण्यास मदत करतात. हायपोग्लाइसेमिया किंवा हायपरग्लेसेमियाचा धोका टाळण्यासाठी उपवास करताना ग्लुकोजच्या पातळीचे निरीक्षण करणे देखील महत्त्वाचे आहे.
हायड्रेशन राखा - मधुमेह असलेल्यांसाठी उपवासादरम्यान डिहायड्रेशन त्रासदायक आहे. उपवास करताना किमान २ ते ३ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. मीठ नसलेले ताक आणि लिंबूपाणी, ग्रीन टी, पुदिन्याचे पाणी, वेलची चहा, स्मूदी व नारळाचे पाणी यांसारखी कमी-कॅलरी पेये नवरात्रीदरम्यान डिहायड्रेशनचा सामना करण्यास मदत करू शकतात.
स्मूदीमध्ये केळीऐवजी सफरचंदासारख्या फळांचा वापर करणे उत्तम आहे. तुम्ही तुमच्या स्मूदीमध्ये २ चमचे फ्लॅक्ससीड्स आणि चिया बिया देखील घालू शकता, कारण ते टाइप २ मधुमेह व मधुमेह होण्याचा धोका कमी करण्यास मदत करतात.
व्यायाम - मधुमेह असलेले लोक उपवासाच्या वेळी व्यायाम करू शकतात. पण व्यायाम कमी प्रमाणात करणे आवश्यक आहे. या काळात स्वतःवर ताण न ठेवणे महत्वाचे आहे. तुम्ही थोडे अंतर चालू शकता आणि दिनक्रमात स्ट्रेचिंग व्यायाम समाविष्ट करू शकता. तुम्ही नवरात्रीच्या दरम्यान व्यायाम देखील करू शकता आणि गरबाच्या सुरांचा आनंद घेऊ शकता.
गरब्याच्या एक तास आधी खाल्ल्याने तुम्हाला गरबा करताना जड वाटणार नाही आणि तुमची एनर्जी कमी होणार नाही याची देखील खात्री मिळेल. मधुमेह असलेल्या लोकांसाठी प्रथिने आणि योग्य कार्बोहायड्रेट्सचे संयोजन उत्तम आहे. अशा स्थितीत तुम्ही ड्राय फ्रूट मिल्कशेक किंवा काही कॉटेज चीज क्यूब्ससह बकव्हीट पॅनकेक सेवन करू शकता.
वरील टिप्स अंमलात आणल्यास नवरात्रीच्या काळात उपवास करणे हा एक उत्तम अनुभव ठरू शकतो. तुम्हाला नवरात्रीचा आनंद घेण्यास आणि तुमच्या रक्तातील ग्लुकोजच्या पातळीबद्दल जास्त काळजी न करता उपवास करण्यास मदत होईल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.