Kidney Health Diet: 'या' 5 प्रकारच्या पदार्थांचा आहारात समावेश करा, किडनी मशीनप्रमाणे करेल काम

Kidney Health Diet: किडनीचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी पोषक पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे.
Kidney Health Diet:
Kidney Health Diet:Sakal
Updated on

Kidney Health Diet: किडनी निरोगी असेल तर आरोग्य देखील चांगले राहते. कारण किडनी शरीरातील अनेक महत्वाचे कामे करत असते. किडनीच्या योग्य कार्यामुळे शरीराचा समतोल राखला जातो. मुत्रपिंड विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.

किडनी योग्यरित्या कार्य करत नसेल तर हे विषारी पदार्थ शरीरात जमा होतात. ज्यामुळे गंभीर आजार निर्माण होतात. किडनी शरीरातील पाणी आणि मीठ यांचे संतुलन नियंत्रित करते, ज्यामुळे रक्तदाब सामान्य ठेवण्यास मदत होते.

किडनी निकामी झाल्यास उच्च रक्तदाब होण्याचा धोका वाढतो. शरीराला पुरेसा ऑक्सिजन पुरवठा करते. किडनी योग्यरित्या कार्य करत नसल्यास, शरीरात विषारी द्रव साचू शकतात, ज्यामुळे किडनी निकामी होणे, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका यांसारखे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि हाडांची कमकुवतता यासारख्या अनेक गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

त्यामुळे शरीराच्या एकूण आरोग्यासाठी किडनी निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. किडनी निरोगी ठेवण्यासाठी पुढील पदार्थांचे सेवन करावे.

बेरी

बेरी खायला चवदार असतात. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडतात. स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी यासारख्या बेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्वे भरपुर असतात. ज्यामुळे किडनीमधील जळजळ कमी होते. तसेच विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात.

पालक

पालकमध्ये अनेक पोषक घटक असतात. हे फायबरचा उत्तम स्त्रोत आहे. पालकामध्ये लोह, मॅग्नेशियम, फायबर आणि व्हिटॅमिन बी असते. जे किडनीला पोषण देतात आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात.

सफरचंद

सफरचंद खाणे आरोग्यदायी असते. अनेक वेळा डॉक्टर देखील सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. यात अनेक पोषक घटक असतात. जे निरोगी ठेवण्यास मदत करतात. सफरचंदांमध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडंट असतात. जे किडनीचे आरोग्य राखण्यास मदत करतात. त्यामुळे किडनीवर कमी दाब पडतो आणि पचनक्रिया सुधारते.

Kidney Health Diet:
Men's Health Care: पुरूषांना उच्च रक्तदाबाचा अधिक त्रास; आरोग्य विभागाचे सर्वेक्षणातून माहिती आली समोर

फुलकोबी

फुलकोबी बहुतांशी हिवाळ्यात बाजारात उपलब्ध असली तरी आजकाल ती प्रत्येक ऋतूत सहज उपलब्ध होते. जी खायला चविष्ट असते आणि पोषक तत्वांनीही भरपूर असते. या भाजीमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि फोलेट भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे किडनी स्वच्छ होण्यास मदत होते आणि डिटॉक्सिफिकेशन प्रक्रिया सुधारते.

लसूण

लसणामध्ये दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे किडनीचे आरोग्य सुधारण्यास आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. त्यामुळे तुमची किडनी निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात लसणाचा समावेश करू शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.