Health: केस पांढरे होण्याचे कारण कोरोना संसर्ग देखील असू शकतो. नीट वाचा.

काही लक्षणे इतकी सामान्य आहेत की प्रत्येकजण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो.
gray hair
gray hairgoogle
Updated on

मुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग आपल्या शरीराच्या जवळजवळ सर्व भागांवर परिणाम करतो. ज्यात केस गळण्याची समस्या देखील आहे. पण तज्ञांना यात आणखीन एक गोष्ट आढळून आली आहे आणि ती म्हणजे संसर्ग झालेल्या लोकांचे अचानक केस पांढरे होता आहेत.

कोविड संसर्ग बरे झाल्यानंतर बरेच लोक दीर्घकाळ कोविडशी झुंज देतात. ज्यामध्ये लोकांच्या श्वसनसंस्था, पचनसंस्था याच बरोबर इतरही अवयवांवर परिणाम होतो. काही लक्षणे इतकी सामान्य आहेत की प्रत्येकजण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो.

कोरोना डोक्यापासून पायापर्यंत, शरीराच्या सर्व भागांवर परिणाम करू शकते. यापैकी एक म्हणजे आपले केस. कोविड संसर्गानंतर अनेकांना केसगळतीचा अनुभव आला आहे. इतकेच नाही तर तुमचे केस नुकतेच पांढरे व्हायला लागले असतील तर त्यामागे कोविड इन्फेक्शन देखील कारण असू शकते.

कोविडमुळे केस पांढरे का होतात ?

- अनेक आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की केस गळण्यासोबतच लोकांमध्ये केस पांढरे होणे देखील दिसून आले आहे. कोविडमुळे केस थेट पांढरे होतात हे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेले नसले तरी, साथीच्या रोगामुळे होणारा ताण हे कारण असू शकते.

जर तुम्ही तुमचे पांढरे केस पूर्ववत करण्यासाठी रंगवणार असाल तर, सल्फर आणि अमोनिया नसलेली उत्पादने निवडा, ज्यामुळे केस गळणार नाहीत.

कोविडमुळे केस गळणे कमी करण्यासाठी टिप्स

केस गळणे हे एका वाईट स्वप्नासारखे असले तरी घाबरु नका, कोविडमुळे तुम्हाला टक्कल पडणार नाही. जर कोरोना संसर्गामुळे केस गळत असतील तर आपल्या खाण्याच्या सवयी सुधारा, ज्यामुळे जलद पुनर्प्राप्ती होईल आणि जास्त केस गळणे टाळता येईल.

केस घट्ट बांधू नका, जसे की बन किंवा उंच पोनीटेल, ज्यामुळे केस गळतात आणि तुटतात. तसेच हीट स्टाइलिंग किंवा हार्श उत्पादने वापरू नका. केसांना कलर करणे, स्मूथिंग किंवा इतर कोणत्याही प्रकारचे उपचार वापरू नका.

केस गळणे, पातळ होणे किंवा पांढरे होण्यामागे तणाव आणि नैराश्य ही प्रमुख कारणे आहेत, त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढा, जेणेकरून हा ताण कमी करता येईल. तणाव व्यवस्थापित करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ध्यानाचा सराव करणे, श्वासोच्छवासाचे व्यायाम करणे किंवा थेरपिस्टशी संपर्क करणे.

आपण केस पांढरे होण्यापासून रोखू शकतो का ?

केसांचे पांढरे होणे पूर्णपणे टाळणे कठीण आहे. पण, जीवनसत्त्वे असलेली फळे आणि भाज्यांचा समावेश असलेले जेवण केल्याने फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर कमीतकमी तणाव घेणे देखील फायदेशीर ठरू शकते. यासह पुरेशी विश्रांती घेणे केसांच्या आरोग्यासाठी चांगले असते, म्हणून रात्रीची झोप घेण्याचा प्रयत्न करा.

व्हिटॅमिन-डी आणि लोहाच्या कमतरतेचाही केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो. तुम्ही त्याची टेस्ट केली तर मदत होऊ शकते. टेस्टनंतर, डॉक्टर आपल्याला योग्य सल्ला देतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.