Health : Acidityवर औषधं घेताय? सावधान! आहे कँसरचा धोका

ॲसिडिटी कमी करण्यासाठी तुम्ही घेत असलेल्या औषधांमुळं तुम्हाला जीवघेणा कॅन्सर होऊ शकतो. जाणून घ्या
Acidity
Acidityesakal
Updated on

Acidity : सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत जेवणाच्या, झोपण्याच्या वेळा नियमित नसणे, सतत ताणाखाली वावरणे यामुळे Acidity हा खूप सामान्य आजार झाला आहे. सहजच कोणीही Acidity वाढली असं सांगतात. मेडिकलवर जाऊन Acidityची गोळी घेऊन खातात. पण हा आजार अवढ्या सहजरित्या घेण्याचा नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतल्या जाणाऱ्या या औषधांमुळे कँसरचा धोका संभवतो.

Acidity
ॲसिडिटी, डोकेदुखीचा आहे त्रास? मग प्या तरेट्याची कॉफी

ॲसिडिटीसारख्या लहान मोठ्या आजारांवर तुम्ही घरच्या घरी उपचार घेत असाल, तर सावधान. कारण ॲसिडिटी कमी करण्यासाठी तुम्ही घेत असलेल्या औषधांमुळं तुम्हाला जीवघेणा कॅन्सर होऊ शकतो. अशाप्रकारच्या तब्बल २६ औषधांवर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. जीवनावश्यक औषधांच्या यादीतून ही २६ औषधं वगळण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.

Acidity
Health: Acidity दूर करण्यासाठी खास रामबाण उपाय

रॅनिटिडीन हे त्यापैकीच एक औषध. ॲसिडिटीसाठी ते सर्रास वापरलं जातं. २०१९ साली अमेरिकेनं त्यावर बंदी घातली, तेव्हापासून भारतातही त्याची काटेकोर पडताळणी सुरू होती. या औषधामध्ये कॅन्सर निर्माण करणाऱ्या एन नायट्रोसोडीमिथाइलमाइनचं प्रमाण धोकादायक पातळीपेक्षा अधिक आढळलं.

त्यामुळं तुम्ही देखील आता काळजी घ्या. ॲसिडिटीचा त्रास असेल तर नेमकी कोणती औषधं घ्यायची, याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाहीतर तुमचा निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो.

Acidity
उन्हाळ्यात Acidity होतेय! हे पाच पदार्थ ठरतील फायद्याचे

कॅन्सर वाढवणाऱ्या २६ औषधांवर बंदी घातली त्यापैकी काही

  • रॅनिटिडीन (Ranitidine)

  • अल्टेप्लेस (Alteplase)

  • एटेनोलोल (Atenolol)

  • ब्लिचिंग पाउडर (Bleaching Powder)

  • कॅप्रोमाइसिन (Capreomycin)

  • सेट्रिमाइड (Cetrimide)

अशा तब्बल २६ औषधांवर केंद्रानं बंदी घातली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.