केळी खाल्यामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो. तसेच तुम्ही जर का दररोज नियमितपणे दोन केळीचे सेवन केल्यास तुमचे अनेक गंभीर आजार दूर होऊ शकतात. यासोबतच केळ हे फळ ब्लड प्रेशर कमी करण्यातही अत्यंत गुणकारी आहे. चला जाणून घेऊया खरचं केळी खाल्याने रक्तदाब कमी होतो का ?
Blood Pressure Control: आताच्या आधुनिक काळात लोकांमध्ये रक्तदाबाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. बहुतेक लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास हा सुरू झालेला आहे. या उच्च रक्तदाबाच्या त्रासाकडे तुम्ही जर का दुर्लक्ष केले तर तुम्हाला हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपला रक्तदाब हा नियंत्रित ठेवणे काळाची गरज झाली आहे.
आपल्या शरीरातील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी लोक विविध प्रकारची औषधे घेत असतात.पण तुम्हाला माहिती का की काही नैसर्गिक उपायांनीही रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की केळी हे असे फळ आहे की जे तुमच्या शरीरातील रक्तदाब नियंत्रित करते. केळीसोबतच संत्री, टरबूज, बीट इत्यादी अनेक फळे देखील तुमचा रक्तदाब नियंत्रित करू शकतात.
चला तर मग आता बघू या की, ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी केळी कशी मदत करू शकते याविषयीची सविस्तर माहिती..
● डाएट मंत्रा क्लिनिक, नोएडाच्या डायटीशियन कामिनी कुमारी यांच्या मते, रोज दोन केळी खाल्ल्याने रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवता येते. तसेच केळी खाऊन तुम्ही हृदयविकाराचा धोकाही कमी करू शकता. आहारतज्ञांच्या मते, अनेक अभ्यासामधून हे सिध्द झाले आहे की केळीमुळे मानवी शरीराला अनेक फायदे होतात.म्हणजे काय तर पोटॅशियम युक्त पदार्थांचे सेवन करून उच्च रक्तदाब नियंत्रित केला जाऊ शकतो.
● केळी मध्ये पोटॅशियम भरपूर असते तसेच सोडियमचे प्रमाण कमी असते, त्यामुळे केळीचे सेवन करणे हे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी खूप चांगले असते. आपल्या शरीरातील अतिरिक्त सोडियममुळे रक्तवाहिन्यांवर ताण येतो, ज्यामुळे शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडते. अशा परिस्थितीत पोटॅशियमयुक्त पदार्थांचे सेवन करून मूत्रपिंडावरील दाब कमी केला जाऊ शकतो, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त मीठ लघवीद्वारे बाहेर टाकण्यास देखील मदत होते.
● या गोष्टी विशेष करून लक्षात ठेवा.
रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज 2 केळी खावे. त्यामुळे रक्तदाब सुमारे 10 टक्क्यांनी कमी होऊ शकतो. मात्र, जर तुम्हाला मधुमेह किंवा इतर गंभीर आजार असतील तर तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच केळी खावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.