Frequent Urination: लघवी म्हणजे शरीराला डिटॉक्स करणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. तुम्ही दिवसातून किती वेळा लघवीला जाता याचा कधी विचार केला आहे का? लघवीला जाणं ही रोजच्या दिनचर्येतील आपल्यासाठी एक साधारण आणि नैसर्गिक क्रिया आहे. त्यामुळेच आपण किती वेळा लघवी करतोय यावर फारसा कुणी विचार करत नाही. Health News Marathi how often should you pee in a day
पण तुम्हाला माहितेय का प्रमाणापेक्षा जास्तवेळा लघवीला होणं किंवा प्रमाणापेक्षा कमी वेळा होणं म्हणजे तुमच्या शरीरातील Human Body कार्यप्रणाली बिघडली आहे Urine problem. यामुळे तुम्हाला काही शारीरिक समस्या निर्माण होवू शकतात.
एका दिवसात तुम्ही गरजेपेक्षा जास्तवेळा बाथरुमला Bathroom जात असला किंवा कमी वेळा याचा अर्थ तुमच्या लाइफस्टाइलमध्ये Lifestyle काही तरी गडबड झालीय आणि तुमच्या शरिरावर त्याचा विपरीत परिणाम झालाय. यासाठी दिवसभरात किती वेळा बाथरुमला जाणं म्हणजेच लघवी होणं योग्य आहे हे जाणून घेऊयात.
लघवीला जाणं हे बऱ्याचदा तुम्ही दिवसभरात किती पाणी पिताय किंवा किती लिक्विड कन्टेंट म्हणजेच पाण्याची मात्रा असलेले पदार्थांचं सेवन करताय यावरही अवलंबून असतं. त्याचसोबत शरारिक आकार, हायड्रेशन पातळी आणि मेडिकल कंडिशनवरही अवलंबून असतं.
दिवसातून किती वेळा लघवीला जावं
दिवसभरात लघवीला जाण्याचं सामान्य प्रमाण हे ६-७ वेळा आहे. म्हणजेच २४ तासांत किमान ६-७ वेळा तरी लघवी करणं गरजेचं आहे how many times to go toilet. आहे अपवादात्मक परिस्थितीत हे प्रमाण ५-१० देखील असू शकतं. ब्लड प्रेशरची समस्या असलेल्या व्यक्तींना किंवा जास्त मीठाचं प्रमाण करणाऱ्यांमध्ये सहसा लघवीला जाण्याचं प्रमाण जास्त असतं.
जास्तवेळी लघवीला होणं चिंतादायक ठरू शकतं
जास्तवेळा लघवीला होणं हे रक्त ओव्हरऍक्टिव झाल्याचं लक्षण असू शकतं. तसंच सारख सारख लघवीला येणं म्हणजेच तुम्हाला मधुमेह, किडनी संबधी आजार किंना युटीआई इंपेक्शन होण्याचंही लक्षण असू शकतं.
याशिवाय सिकल सेल एनीमियामुळे लघवीचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते. तसचं एखादी महिला गरोदर असल्यास वारंवार लघवीला येण्याची समस्या भेडसावू शकते. तसचं गरोदरपणाच जसजसे महिने वाढत जातात तसं तसं मुत्राशयावर दाब येत असल्याने महिला वारंवार लघवीला जातात.
कमीवेळा बाथरुमला जाणंही चिंतादायक
कमीवेळा लघवीला येण्याची अनेक कारण असू शकतात. यात पाणी कमी पिणे, जास्त हाइड्रेशन तसचं ट्यूमर, वाढलेले प्रोस्टेट तसंच ब्लॅडर म्हणजेच मुत्राशयासंबधी एखादी समस्या असल्यास असं होवू शकतं. पुरेसं पाणी पिऊनही लघवीला योग्य प्रमाणात होत नसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. तसचं काही आजार किंवा त्या आजाराची लक्षण असलेल्यांना लघवीला जास्त किंवा कमी वेळा येऊ शकते.
हे देखिल वाचा-
प्रोस्टेट- अधिकवेळा लघवीला होण्याची समस्या पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. जेव्हा प्रोस्टेट ग्रंथींचं प्रमाण वाढत तेव्हा तेव्हा ते मुत्राशयातील मूत्र प्रवाह रोखून धरू शकतं. यामुळे लघवी केल्यानंतरही पोट रिकामं झाल्यासारख वाटतं नाही आणि सारखं लघवीला जावं वाटतं. तचसं हाय ब्लड प्रेशल आणि किडनीच्या समस्यांवर घेतल्या जाणाऱ्या औषधांमुळे देखील वारंवार लघवी येण्याची शक्यता वाढते.
हाइपरलकसीमिया- शरीरात कॅल्शियमच प्रमाण नियंत्रणात नसल्यास त्याचा परिणामही मूत्र प्रवाहावर होतो.
सिकल सेल एनिमिया- यामध्ये किडनीच्या काम करण्याच्या क्षमतेवर आणि युरीन कंसन्ट्रेशनवर प्रभाव पडतो. त्यामुळे हा आजार असलेल्या रुग्णांमध्ये किंवा या आजाराची लक्षण असेल्यांना अधिक वेळा लघवी येते.
UTI यूरीनरी ट्रॅक इंफेक्शन – UTI ही समस्या पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळते. यात वारंवार लघवीला येऊ शकते. यूरीन इंफेक्शन दरम्यान ९ हून अधिकवेळा तुम्हाला लघवीला येऊ शकते. यावेळी लघवीची मात्रा ही कमी देखील असू शकते तसचं लघवी करताना जळजळ देखील होण्याची शक्यता असते. Urine infection cause
याचसोबत लघवीला आल्यास ती रोखून न धरता कधीही लगेच लघवीला जाणं गरजेच आहे. जास्त काळ लघवी रोखून धरल्यास ब्लॅडरमध्ये बॅक्टेरिया जलदगतीने विकसित होण्याची शक्यता वाढते असं तज्ञ सांगतात. यामुळे भविष्यात अनेक गंभीर समस्या उद्भवू शकता. तसंच जास्त वेळ लघवी रोखून धरल्यास किडनी निकामी होण्याची शक्यता बळावते.
आयुर्वेदानुसार एका व्यक्तीला दिवसभरात किमान २-३ लिटर पाणी गरजेच आहे. ज्यातील दीड लिटर पाणी शरीर वापरत आणि उरलेलं पाणी लघवीच्या वाटे शरिराबाहेर फेकलं जातं. आपल्या मणक्यातील नसा लघवीला कधी जायचं याचे संकेत मेंदूला देतात.
मात्र जेव्हा हे संकेत सारखे सारखे दिले जातात तेव्हा खरी अडचण निर्माण होते. दिवसातून ५ते ८ वेळा असं होणं गरजेचं आहे. ज्यामुळे आपलं युरिन सिस्टम योग्य कार्य करतंय हे लक्षात येतं. जर त्याहून जास्त वेळा तुम्ही लघवीला जात असाल तर ते ओव्हर ऍक्टिव ब्लॅडरचे संकेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.