Tuberculosis : क्षयरोग झालेल्या मुलांमध्ये ‘ड’ जीवनसत्वांची कमतरता; संशोधनातील निष्कर्ष

तेलंगणमध्ये रूग्णालयांत करण्यात आलेल्या संशोधनातील निष्कर्ष
health tb hospitals Telangana Vitamin D deficiency in children with tuberculosis
health tb hospitals Telangana Vitamin D deficiency in children with tuberculosissakal
Updated on

नवी दिल्ली : क्षयरोग (टीबी) झालेल्या मुलांमध्ये त्याचा संसर्ग न झालेल्या मुलांच्या तुलनेत ‘ड’ जीवनसत्त्वाची अधिक कमतरता आढळते, असा निष्कर्ष तेलंगणमध्ये रुग्णालयांत केलेल्या संशोधनातून काढण्यात आला आहे. क्यूरियस या नियतकालिकात यासंदर्भातील संशोधन प्रकाशित झाले आहे.

health tb hospitals Telangana Vitamin D deficiency in children with tuberculosis
TB Patient: लॉकडाऊनकाळात ४३ हजार नवे क्षयरोग रुग्ण

टीबी झालेल्या मुलांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता अधिक असून ती १० नॅनोग्रामपेक्षा कमी असल्याचे संशोधकांनाअएढळले. तेलंगणमधील सिद्दीपेट येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि उस्मानिया वैद्यकीय महाविद्यालयातील संशोधकांनी संयुक्तपणे हे संशोधन केले.

त्यासाठी त्यांनी निलोफर रुग्णालयातील काळजी केंद्रात टीबीचा संसर्ग झालेल्या मुलांचा सुमारे दीड वर्षे अभ्यास केला. या मुलांमध्ये सहा महिन्यांपासून बारा वर्षांपर्यंतच्या ७० मुलांचा समावेश होता.

health tb hospitals Telangana Vitamin D deficiency in children with tuberculosis
Health Tips: आरोग्य आणि सौंदर्यासाठी कोरफडीचा ज्यूस ठरतो फायदेशीर

संशोधकांनी सहभागी मुलांची वयोगटानुसार एक ते चार वर्षे, पाच ते आठ आणि नऊ ते बारा या तीन वयोगटांत विभागणी केली. त्यावेळी या मुलांमध्ये ड जीवनसत्त्वाची सरासरी पातळी १०.४३ नॅनोग्राम असल्याचे आढळले. टीबी असलेल्या मुलांमध्ये ड जीवनसत्त्वाची तीव्र कमतरता असल्याचे संशोधकांनी सांगितले.

त्याचप्रमाणे, ड जीवनसत्त्वाच्या अधिक कमतरतेचा कुपोषण तसेच मुलांच्या दुर्बल सामाजिक-आर्थिक परिस्थितीशी संबंध असून हा धोका वैद्यकीय तज्ज्ञांनी लक्षात घेतला पाहिजे, असे आवाहनही संशोधकांनी केले आहे. टीबी हा जगभरात वेगाने पसरणाऱ्या घातक संसर्गजन्य आजारांपैकी एक आहे. विकसित देशांमध्ये सहव्याधी तसेच मृत्यूचेही टीबी प्रमुख कारण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.