Senior Citizens Care Tips: निरोगी राहण्यासाठी आहार आणि योगा महत्वाचा आहे. तसेच आरोग्याची तपासणी करणेही गरजेचे आहे. आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्यकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात. पण वाढत्या वयानुसार अनेक आरोग्यासंबंधित समस्या निर्माण होतात. यामुळे वेळीच आरोग्यासंबंधित तपासणी करून अनेक गंभीर आजारांना दूर ठेऊ शकता. वयाच्या साठ वर्षानंतर कोणत्या आरोग्यासंबंधित तपासणी केल्या पाहिजेत हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
जर तुमचे वय साठपेक्षा जास्त असेल तर ब्लड शुगरची तपासणी करावी. आजकाल मधुमेह हा आजार सामान्य झाला आहे. पण वेळीच काळजी घेतल्यास नियंत्रणात ठेवता येते. मधुमेहामुळे हृदयविकार, मज्जातंतूंचे नुकसान आणि अंधत्व येण्याचा धोकाही वाढू शकतो. त्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासत राहा.
लिपिड प्रोफाइल तपासणे आणि त्याचे निरीक्षण करणे आपल्याला रक्तातील कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्सवर लक्ष ठेवण्यास मदत करते. स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास देखील हे मदत करते. उच्च कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो, कोलेस्टेरॉलची पातळी नियमितपणे तपासणे आवश्यक आहे.
हाय ब्लड प्रेशर किंवा ब्लड प्रेशर याला सायलेंट किलर रोग म्हणतात. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. तुमचे वय साठपेक्षा जास्त असेल तर नियमितपणे ब्लड प्रेशर नियमितपणे तपासावा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.