Health Tips: पाठदुखीने हैराण आहात? ट्राय करा ३ सोपे उपाय

दिवसभर बसून पाठीच्या कणा अवघडला असेल तर किमान व्यायामप्रकार करायलाच हवेत.
Health Tips
Health Tipsesakal
Updated on

Back Pain: बसण्याच्या चुकीच्या पध्दतीमुळे कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर सतत ८-१० तास काम यामुळे नसल्याने काही वेळाने आपली पाठ दुखायला लागते. पाठ आणि कंबरदुखी मागे लागली की आपल्याला काहीच सुधरत नाही. कधी आपण खूप पुढे वाकून बसतो तर कधी बराच काळ पाठीत वाकलेले राहतो. सुरुवातीला आपल्याला हे लक्षात येत नाही, पण जसजसे दिवस जातात तशी आपल्याला आपल्या शरीराची ठेवण चुकल्याची आणि त्यामुळे पाठदुखीचा त्रास सुरू झाल्याची जाणीव व्हायला लागते.

Health Tips
Health Tips: Periods पुढे ढकलायचेत? ट्राय करा 'हे' घरगुती उपाय

मग कमी वयातच पाठीचं दुखणं मागे लागतं आणि मान- पाठ, खांदे आखडून जातात. एकदा पाठ आणि कंबरदुखी मागे लागली की आपल्याला काहीच सुधरत नाही. दिवसभर बसून पाठीच्या कणा अवघडला असेल तर किमान व्यायामप्रकार करायलाच हवेत. शरीराचा संपूर्ण भार पेलणारी पाठ चांगली तर आपल्या दैनंदिन हालचाली चांगल्या राहतात.

Health Tips
Health Tips: 'या' टिप्स फॉलो करा, कामाच्या मधात तुम्हाला येणारा आळस आणि झोप आपोआप होईल दूर

रोजच्या धावपळीत व्यायामाला वेळ मिळत नाही ही अनेकांची तक्रार असते. अशावेळी आपण डॉक्टरांकडे धाव घेतो. पण बैठ्या जीवनशैलीमुळे उद्भवलेली ही समस्या दूर करण्यासाठी औषध-गोळ्या घेण्यापेक्षा जाता येता काही सोपे व्यायाम करणे हा केव्हाही उत्तम उपाय असतो. पाठ, कंबर, मणका हे आपल्या संपूर्ण शरीराला व्यवस्थित ठेवण्याचे काम करतात. त्यामुळे आपण कितीही धावपळीत असू तरी थोडा वेळ काढून आपल्या कंबरेच्या, पाठीच्या दुखण्यावर उपयुक्त असे व्यायामप्रकार आवर्जून करायला हवेत.

Health Tips
Health Tips: झोप पूर्ण होऊन पण येतो आळस? हे उपाय करा

हॅमस्ट्रींग स्ट्रेच

पाठीवर झोपून डावा पाय गुडघ्यात वाकवा. उजवा पाय सरळ उचलून दोन्ही हाताने या पायाला गुडघ्यापाशी आधार द्या. हे करताना डोकं, पाठ, खांदे जमिनीला नीट टेकलेले राहतील याची काळजी घ्या. वर घेतलेला पाय जास्तीत जास्त आपल्या बाजुने खेचला तर पाठीला चांगला ताण पडतो. हा व्यायाम १० ते २० सेकंदांसाठी करा.

Health Tips
Health News: डेंग्यू पेशंटच्या डाएटमध्ये 'या' गोष्टींचा करा समावेश, होईल फास्ट रिकव्हरी

पवनमुक्तासन

पाठीच्या कण्याला ताण पडावा यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त असते. पाठीवर झोपून दोन्ही पाय काटकोनात सरळ करावेत. त्यानंतर पाय गुडघ्यात वाकवून गुडघे जास्तीत जास्त पोटाकडे ओढून घ्यावेत. यामुळे पोटाला तर ताण पडतोच पण मणक्यालाही ताण पडतो.

Health Tips
Health Tips: सकाळी उठल्यावर डोकेदुखी होते का? ताबडतोब करा हे उपाय

स्पायनल स्ट्रेच

कोणत्याही अवयवासाठी स्ट्रेचिंग हा उत्तम व्यायामप्रकार असून त्यामुळे आखडलेले स्नायू मोकळे होण्यास मदत होते. सकाळी झोपेतून उठल्यावर किंवा रात्री झोपताना ऑफीसमधून घरी आल्यावर काही किमान स्ट्रेचिंग केल्यास शरीराला आलेला ताण कमी होण्यास मदत होते.

Health Tips
Health Tips: पुरूषांनी करावे बटरफ्लाय आसन, होतात हे फायदे

वज्रासनात बसून डोके खाली टेकवायचे आणि दोन्ही हात समोरच्या बाजुने ताणायचे. यामुळे कण्याला आणि पाठीच्या इतर स्नायूंनाही चांगलाच ताण पडतो आणि आराम मिळण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.