Coffee Benefits: कॉफी आरोग्यासाठी वाईट असते?, आधी फायदे तर जाणून घ्या!

एक कॉफीचा कप दररोज घ्याल तर सगळेच आजार पळतील दूर
Coffee Benefits and Side effects
Coffee Benefits and Side effectsesakal
Updated on

Health Tips : काही लोकांना ऊर्जेसाठी चहा किंवा कॉफीची गरज असते. सकाळी उठल्याबरोबर लोकांना कॉफीची गरज भासू लागते. दिवसभर ऑफिसमध्ये काम करताना किंवा रात्री उशिरापर्यंत जागे राहून लोक कॉफीचे सेवन करतात. कॉफीची सवय लागणे ही काही फार मोठी गोष्ट नाही. पण, तिच्याबद्दल अद्याप काही गैरसमज आहेत.

कॉफीचे सेवन शरीरासाठी हानिकारक असल्याचे अनेक लोक सांगतात. कॉफीमध्ये कॅफेन हा मुख्य घटक आहे, ज्यामुळे शरीरातील बहुतेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. कॉफीच्या अतिसेवनामुळे आजार होऊ शकतात.एका अंदाजानुसार, जगभरातील लोक दररोज सुमारे 2.25 अब्ज कप कॉफी पितात.

काही अभ्यासांमध्ये असे आढळून आले आहे की, कॉफीचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास अनेक गंभीर आजारांमध्ये फायदे मिळू शकतात. कॉफी अनेक रोगांचा धोका कमी करण्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकते.

योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी कॉफीचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. जास्त प्रमाणात सेवन करणे हानिकारक ठरू शकते. चला जाणून घेऊया आरोग्यासाठी कॉफीचे सेवन करण्याचे फायदे आणि तोटे.

कॉफीमधील घटक

कॉफीमध्ये आढळणारे पोषक घटक कॉफीमध्ये अनेक पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. रिबोफ्लेविन (व्हिटॅमिन बी 2), नियासिन (व्हिटॅमिन बी 3), मॅग्नेशियम, पोटॅशियम, विविध फिनोलिक संयुगे आणि अँटीऑक्सिडंट्स कॉपीमध्ये असतात. तज्ञांच्या मते, या पोषक तत्वांचा मानवी शरीराला विविध प्रकारे फायदा होऊ शकतो.

कॉफी पिण्याचे फायदे

टाईप 2 मधुमेहाचा धोका कमी करतात

कॉफीचे सेवन केल्याने टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो, असा खुलासा संशोधकांनी केला आहे. 2014 च्या अभ्यास अहवालानुसार  48,000 हून अधिक लोकांवर संशोधन करण्यात आले. जे लोक गेली चार वर्ष न चुकता किमान एक कप कॉफी पितात त्यांना टाइप 2 मधुमेहाचा धोका 11 टक्के कमी असतो.

पण, मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कॉफीचे सेवन करावे. चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे.

कॉफी पिणाऱ्यांना मधुमेह होत नाही
कॉफी पिणाऱ्यांना मधुमेह होत नाहीesakal

पचन सुधारते

कॅफीचे सेवन करणे पचनसंस्थेसाठी फायद्याचं ठरतं.कॉफी नियमित पिल्याने पचन क्षमता 3-11 टक्क्यांनी वाढते. त्यामुळेच कॉफीला फॅट बर्निंग पूरक मानले जाऊ शकते. लठ्ठ लोकांची चरबी कमी करण्यासाठी कॅफिन उपयुक्त ठरू शकते.

कॅन्सरचा धोका टळतो

एका अभ्यासानुसार, कॉफीच्या सेवनाने लिव्हर कॅन्सरचा धोका कमी होतो. अमेरिकन संशोधकांनी केलेल्या अहवालानुसार जे लोक दररोज दोन ते तीन कप कॉफी पितात त्यांना हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा आणि जुनाट यकृत रोग होण्याचा धोका कमी होतो.

रक्तदाब नियंत्रणात राहतो 

कॉफी रक्तदाब नियंत्रणासाठी देखील फायदेशीर ठरू शकते. एका अभ्यासात, संशोधकांना असे आढळून आले की दररोज तीन ते पाच कप कॉफी प्यायल्याने हृदयविकाराचा धोका 15 टक्क्यांपर्यंत कमी होतो.

रक्तदाबावर नियंत्रण येत
रक्तदाबावर नियंत्रण येतesakal

कॉफी पिण्याचे तोटे

  • कॉफीच्या सेवनामुळे पचनाचा धोका कॉफीच्या सेवनाने पोटात ऍसिडचे उत्पादन वाढते. कॅफीन देखील शरीरासाठी हानिकारक स्टोमा ऍसिड तयार करण्याचे कारण बनू शकते. त्यामुळे पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम होतो.

  • कॉफीचे अतिसेवन किंवा कॉफीने सकाळची सुरुवात केल्याने अपचन, फुगणे, मळमळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

  • डिहायड्रेशन सकाळी कॉफीने दिवसाची सुरुवात करणे हानिकारक ठरू शकते. रात्री बराच वेळ पोट रिकामे राहते आणि पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी सकाळी पाणी प्यावे.

  • सकाळी कॉफी प्यायल्यावर शरीरात पाण्याची कमतरता जाणवते आणि डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. कॉफीमध्ये आढळणारे कॅफिन लघवी वाढवते, ज्यामुळे डिहायड्रेशनचा धोका देखील वाढू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.