Health Tips : निरोगी यकृत, मधुमेह आणि बरंच काही... एक कप कॉफी ठरते फायदेशीर, अभ्यासातून झाले स्पष्ट

महिलांसाठी दिवसातून तीन ते पाच कप कॉफी पिणे सुरक्षित आहे
World Liver Day 2024
World Liver Day 2024 esakal
Updated on

 World Liver Day 2024 :

आजकाल चुकीच्या जगण्याच्या पद्धतीमुळे आपल्याला अनेक आजार होतात. यात यकृताचे कार्य बिघडण्याचे प्रमाण वाढले आहे. यकृताचे कार्य बिघडले तर आपल्याला अनेक प्रकारच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

कॉफीचे सेवन कमी प्रमाणात केल्यास विविध प्रकारचे आरोग्य फायदे होऊ शकतात. यकृताच्या या आजारांवर कॉफीचे सेवन फायद्याचे ठरते असे एका अभ्यासात दिसून आले आहे. एवढेच नाही तर यकृतातील गुंतागुंत कमी करण्यासाठीही हे फायदेशीर आढळले आहे.

याचा अर्थ फॅटी लिव्हर आणि लिव्हर सिरोसिस सारख्या समस्यांचा धोका कमी करण्यासाठी कॉफी आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

World Liver Day 2024
Coffee Side Effects: या 5 लोकांनी चुकूनही कॉफी पिऊ नये, समस्या वाढू शकते

एका अभ्यासात, शास्त्रज्ञांना असे आढळून आले की ज्या लोकांना नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग आहे त्यांना कॉफी पिल्याने त्याचा त्रास कमी होण्यास फायदा होतो.

यापूर्वीच्या अभ्यासातही कॉफीचे नियमित सेवन हृदयाचे आरोग्य, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असल्याचे दिसून आले होते.

जॉन्स हॉपकिन्सच्या अहवालानुसार, अमेरिकन लोकांसाठी जाहीर केलेल्या आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वांनुसार, महिलांसाठी दिवसातून तीन ते पाच कप कॉफी पिणे सुरक्षित आहे, ज्यामध्ये जास्तीत जास्त 400 मिलीग्राम कॅफिन असते.

World Liver Day 2024
Morning Coffee : तुम्हीही सकाळी उठून कॉफी पिता काय? लगेच बंद करा ही सवय, वाचा एक्सपर्टचा महत्वाचा सल्ला

पण तुम्ही गर्भवती असाल किंवा स्तनपान करत असाल तर या संदर्भात डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे. दररोज सरासरी दोन-तीन कप कॉफी तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, दररोज दोन कप कॉफी पिल्याने यकृताचा आजार असलेल्या लोकांमध्ये यकृताचा सिरोसिस आणि यकृताचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो. संशोधकांना असे आढळून आले की दररोज तीन-चार कप कॉफी प्यायल्याने यकृताच्या जुनाट आजाराची समस्या 71 टक्क्यांनी कमी केली जाऊ शकते.

World Liver Day 2024
Coffee With Sakal : जळगाव मनपा हद्दीपासून 2 किलोमीटरचे क्षेत्र विकसित होणार : डिगेश तायडे

डिप्रेशनमध्ये फायदेशीर आहे का?

या अभ्यासादरम्यान घेतलेल्या चाचण्यांमध्ये असे दिसून आले आहे की, दोन कप कॉफी प्यायल्याने नैराश्याचा धोका 8 टक्क्यांनी कमी होतो. कॉफी मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम करते आणि चिंता विकार कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे.

मधुमेहाच्या समस्या कमी होतात

या अभ्यासात असे आढळले आहे की, जे लोक कॉफी पितात त्यांना रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका कमी असतो. टाईप-2 मधुमेहाचा विकास आणि त्याच्या गुंतागुंत कमी करण्यासाठी कॉफीचे नियमित सेवन करणे देखील तुमच्यासाठी फायदेशीर आहे.

दररोज दोन ते तीन कप कॉफीमुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका 6 टक्क्यांनी कमी होतो. स्वादुपिंडातील बीटा पेशींच्या कार्याला चालना देण्यासाठी आणि इन्सुलिन निर्मितीसाठी देखील हे फायदेशीर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.