Yoga For Spinal Cord : तुमच्याही पाठीला बाक आलंय का? पाठीचा कणा सरळ होण्यासाठी करा ही आसने

आपली देखील पाठ पुढील बाजूस झुकली असेल तर नियमित काही निवडक आसनांचा योग्य पद्धतीने सराव केल्यास पाठी कणा सरळ होण्यास मदत मिळू शकते.
Yoga For Spinal Cord
Yoga For Spinal CordSakal
Updated on

आपणही दिवसभर एकाच ठिकाणी बसून काम करताय का? तर मग वेळीच व्हा सावध. कारण यामुळे तुमच्या पाठीच्या कण्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. दिवसभर डेस्कवर बसून पाठ वाकवून काम केल्यास तुमच्या शरीराचे पॉश्चर खराब होते आणि हळूहळू पाठीला देखील बाक येऊ लागते, हे लक्षात घ्या मंडळींनो. 

दीर्घकाळ अशा स्थितीत बसल्यास तुमच्या पाठीच्या कण्यावर वाईटरित्या ताण येतो. जर वेळीच ही वाईट सवय न सुधारल्यास पाठीशी संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते.  

Yoga For Spinal Cord
Weight Loss Drink हे हेल्दी ड्रिंक प्या! शरीर डिटॉक्स होण्यासह वजनही घटेल, जाणून घ्या फायदे

पाठीचा कणा सरळ राहावा, शरीराचे पॉश्चर नीट दिसावे, पाठीशी संबंधित समस्या उद्भवू नये, अशी इच्छा असल्यास आपल्या वर्कआऊट रूटीनमध्ये काही आसनांचा समावेश करा व नियमित सराव देखील करावा. 

पर्वतासन 

पर्वतासनामुळे पाठीचा कण सरळ होण्यास मदत मिळते. या आसनामुळे पाठीच्या कण्यास चांगला स्ट्रेच मिळतो. ज्यामुळे पाठीच्या कण्यातील रक्तप्रवाहाची प्रक्रिया सुधारते. शिवाय हात, खांदे, मानेचे स्नायू देखील मजबूत होण्यास मदत मिळते. 

Yoga For Spinal Cord
अंड्यासह कधीही खाऊ नका हे खाद्यपदार्थ, आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम

गोमुखासन

खांद्याचे व पाठीचे स्नायू आखडण्याच्या समस्यातून सुटका हवी असल्यास गोमुखासनाचा सराव करा. या आसनामुळे पाठीच्या कण्याचा चांगला व्यायाम होतो,  पाठीचा कणा लवचिक होतो आणि महत्त्वाचे म्हणजे पॉश्चर देखील सुधारण्यास मदत मिळते. 

Yoga For Spinal Cord
हळदीच्या दुधामध्ये चिमूटभर मिक्स करा ही पावडर, एकही आजार तुम्हाला करणार नाही स्पर्श

गरूडासन

गरूडासनामुळे खांदे, पाठ, नितंब आणि मांड्या हे अवयव चांगल्या पद्धतीने स्ट्रेच होतात. यामुळे पाठीचा कणा, पायाचे व खांद्यांचे स्नायू लवचिक तसेच मजबूत देखील होतात. तसेच एकाग्रता क्षमता देखील सुधारते. 

वज्रासन 

वज्रासनामुळे आरोग्यास अगणित लाभ मिळतात. पाठीशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी हे आसन अतिशय लाभदायक आहे. वज्रासनाचा अभ्यास करताना पाठीचा कणा ताठ ठेवावा लागतो. यामुळे संपूर्ण कण्याचा योग्यरित्या व्यायाम होतो, रक्तप्रवाह सुधारतो. याव्यतिरिक्त पचनप्रक्रिया देखील सुधारते.  

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()