गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. कारण,शरीरात कोलेस्टेरॉल वाढण्याचं प्रमाण वाढलं आहे. कोलेस्टेरॉल हा हृदयाचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, हृदयविकार हे जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. आम्ही तुम्हाला सांगूया की तुमच्या बहुतांश हृदयविकारांचे प्रमुख कारण उच्च कोलेस्टेरॉल आहे.
कोलेस्टेरॉल हा एक चरबीसारखा पदार्थ आहे जो यकृताद्वारे तयार होतो जो पचन, व्हिटॅमिन डी आणि काही हार्मोन्सच्या निर्मितीसाठी आवश्यक असतो. कोलेस्टेरॉल विरघळत नाही, म्हणून ते स्वतःहून इतर अवयवांपर्यंत पोहोचू शकत नाही. यासाठी लिपोप्रोटीन नावाचे कण आवश्यक असतात जे रक्ताद्वारे कोलेस्टेरॉल इतर अवयवांपर्यंत पोहोचवण्यास मदत करतात.
जर तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली असेल आणि तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नैसर्गिक मार्ग शोधत असाल, तर तुम्ही तुमच्या आहारात काही खास गोष्टींचा समावेश करून LDL कमी करू शकता.
हार्वर्ड हेल्थच्या म्हणण्यानुसार, संतुलित आहारामुळे तुमचे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतेच, पण हृदयविकाराचा झटका आणि हृदयाशी संबंधित इतर आजारांचा धोकाही कमी होतो. सुप्रसिद्ध आहारतज्ञ तज्ञ मनप्रीत कालरा यांनी इंस्टाग्रामवर सांगितले की आहारात काही गोष्टींचा समावेश करून आपण खराब कोलेस्ट्रॉल कमी करू शकतो आणि धोकादायक आजारांपासून दूर राहू शकतो.
वजन वाढणे
पायांमध्ये सतत वेदना होणे
घाम येणे
त्वचेचा पोत बदलणे
छातीत दुखणे
या बियांमध्ये पाण्यामध्ये विरघळणारे फायबर मुबलक प्रमाणात असतात. जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी जेवणाआधी पाण्यात मिसळून या बियांचे सेवन केले तर त्याचा फायदा होतो. यामुळे कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.
अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स मोठ्या प्रमाणात आढळतात. ज्यामुळे हृदयाला गंभीर आजारांपासून वाचवण्यात आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत होते. सकाळी दोन अक्रोड खाल्ल्याने तुम्हाला फरक जाणवू लागेल.
यामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्सचे प्रमाण जास्त असते, जे जळजळ कमी करते आणि एलडीएल पातळी कमी करण्यास मदत करते. जेवणापूर्वी आहारात याचा समावेश केला जाऊ शकतो.
आले वजन कमी करण्यासाठी फायद्याचे आहे. त्यामुळे, अनेक लोक डिटॉक्स वॉटरमध्ये आल्याचा समावेश करतात. आल्याचे सेवन नियमित केलं तर रक्तप्रवाहात जमा झालेले खराब कोलेस्टेरॉल काढून टाकण्याचे आणि जळजळ कमी करण्याचे काम करते. आपण चहा म्हणून देखील वापरू शकता.
फोडणीसाठी महत्त्वाचा असलेला लसूण कोलेस्टेरॉलही वितळवतो. लसणात एलिसिन नावाचे तत्व आढळते, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. भाजी किंवा डाळीत घालून तुम्ही ते खाऊ शकता. आयुर्वेदातही लसणाला महत्त्व आहे. त्यामुळे सकाळी उपाशीपोटीही लसणाच्या दोन पाकळ्या खाऊ शकता, यानेही फायदा होतो.
ओट्स हे वजन कमी करणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे. जर, तुम्हाला शरीरातील कोलेस्टेरॉल आणि वजन कमी करायचे असेल तर तुम्ही ओट्सचे सेवन करा. ओट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, ते खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यामध्ये याचा समावेश करा.
तुम्ही चपातीच्या ऐवजी भाकरीचे सेवन करा. अनेक आवश्यक पोषक घटक असतात जे खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करतात. तुम्ही ज्वारी, बाजरी, नाचणीची भाकरीही खाऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.