Summer Exercise Tips: उन्हाळ्यात जास्त Workout करणं पडू शकतं महागात, या गोष्टींकडे द्या लक्ष

Summer Exercise Tips: उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एक्सरसाइज Exercise करत असताना काही गोष्टींची दखल घेणं गरजेचं आहे. वाचा काय घ्यायची काळजी ते....
Summer Exercise Tips
Summer Exercise TipsEsakal
Updated on

Summer Exercise Tips: वजन नियंत्रणात राहण्यासोबतच फिट राहण्यासाठी दररोज व्यायाम करणं गरजेचं आहे. यासाठीच अनेकजण दररोज जिममध्ये जाऊन नियमित एक्सरसाइज करतात. काहीजण तर वजन कमी करण्यासाठी तर काही मसल्स Muscles बनवण्यासाठी तासंतास जिममध्ये घालवतात.

मात्र उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एक्सरसाइज Exercise करत असताना काही गोष्टींची दखल घेणं गरजेचं आहे. Health Tips in Marathi How to exercise in gym during summer

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गरमी वाढू लागली की जास्त जिम Gymnasium करणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. त्यामुळेच उन्हाळ्य़ाच्या Summer दिवसांमध्ये कधी, कितीवेळ आणि कोणत्या प्रकारचा व्यायाम करावा तसचं कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेणं गरजेचं आहे. Avoid over workout in summer

तज्ञांच्या म्हणण्यानुसार जिम किंवा एक्सरसाइज सुरू करण्यासाठी हिवाळा ही अगदी योग्य वेळ असते. मात्र अलिकडे अनेकजण आपल्या वाढत्या वजनाबाबत तसचं फिटनेस बाबतीत खूपच दक्षता घेत असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांमध्येही तासनतास जिम करतात.

उन्हाळ्यात वातावरणातील तापमान खूपच जास्त असतं. अशावेळी शरिरातील पाण्याची पातळी सतत कमी होत असते. त्यात जिममध्ये घाम गाळल्यानंतर अधिक डिहाइड्रेशन होण्याची शक्यता असते.

अशा वेळी योग्य काळजी न घेतल्यास त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होवू शकतो. पहिल्यांदा जिम सुरू करणाऱ्यांनी हिवाळ्यात जिम सुरू करणं हाच योग्य पर्याय आहे. Summer workout tips

वर्कआउटसाठी योग्य वेळ कोणती

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सकाळी ९ वाजल्यानंतरच तापमानात वाढ होण्यास सुरूवात होते. यासाठीच सकाळी ९ वाजण्यापूर्वी जिमला जाऊन व्यायाम करणं हा चांगला पर्याय आहे.

सकाळी वर्कआउट केल्याने तुमचा संपूर्ण दिवस फ्रेश जाऊ शकतो. मात्र जर तुम्हाला सकाळी लवकर उठून जिमला जाणं शक्य नसेल तर दुपारच्या वेळेत जिमला जाणं टाळावं. अशावेळी सुर्यास्तानंतर तुम्ही संध्याकाळची वेळ वर्कआउटसाठी निवडू शकता. 

हे देखिल वाचा-

Summer Exercise Tips
Gym Tips : स्टायलिश लूक आणि व्यायामासाठीही कम्फर्टेबल; जिमसाठी हे कपडे आहेत उत्तम

पुरेसं पाणी पिणं गरजेचं

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घाम येण्याचं प्रमाण वाढल्याने शरिरात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळेच योग्य प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. मात्र जिममध्ये एक्सरसाइज करत असताना जास्त पाणी पिण्याती चूक करू नका.

वर्कआऊट करत असताना मध्ये एखादा छोटासा ब्रेक घेऊन बसून फक्त काही घोट पाणी प्यावं. त्यापेक्षा जर सकाळी उठल्य उठल्या २ ग्लास पाणी प्यावं. तुम्ही लिंबू आणि मधाचं पाणी देखील पिऊ शकता.

सकाळच्यावेळी पुरेसं पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. तसचं पोट साफ होण्याची चिंतादेखील दूर होते. फक्त पाणी प्यायल्यानंतर किमान ३०-४० मिनिटं वर्कआऊट करू नये. 

वर्कआऊटच्या वेळी एनर्जी ड्रिंक पिऊ नये

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सतत काही ना काही गार पिण्याची इच्छा होत असते. अशावेळी अनेकजण एक्सरसाइज करतानाही थकवा दूर करण्यासाठी एनर्जी ड्रिंक पिणं पसंत करतात. 

मात्र वर्कआऊट करताना कधीही स्ट्रेंथ किंवा स्टॅमिना वाढवण्यासाठी एनर्जी ड्रिंक पिऊ नये. या पेयांमध्ये ग्लूकोज आणि साखरेचं प्रमाण जास्त असल्याने ते पिणं टाळवं. यापेक्षा अधून मधून पाण्याचे फक्त काही घोट पिणं अधिक उत्तम.

वर्कआऊटनंतर लगेच आंघोळ टाळावी

वर्कआऊट केल्यानंतर गरमी आणि घामामुळे अनेकजण लगेचच आंघोळ करतात. बऱ्याचदा जिममध्येच बाथरूमची सोय असते. अशावेळी अनेकजण वर्कआऊट झाल्यानंतर फ्रेश वाटण्यासाठी लगेचच शॉवर घेतात.

मात्र यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. वर्कआऊटनंतर थोडावेळ आराम करावा. यामुळे तुमच्या शरीराचं वाढलेलं तापमान पुन्हा नॉर्मल होण्यास सुरुवात होईल. त्यानंतरच आंघोळ करावी. 

वर्कआऊटसाठी योग्य कपडे

घरी किंवा जिममध्ये कधीही व्यायाम करण्यासाठी लूज म्हणजेच ढगळे कपडे घालावे. तसचं फिक्या रंगाच्या कपड्यांची निवड करावी. टाइट कपडे घातल्यास कपडे शरिराला चिटकून राहिल्याने शरीर आणखी गरम राहील. यासाठीच उन्हाळ्यात वर्कआऊटसाठी लूज कपडे घाला. 

Summer Exercise Tips
Gym Tips : व्यायामामुळे रक्तवाहिन्यांना असा असतो धोका; जिममध्ये जात असाल तर ही काळजी घ्या

वेळीच घ्या या गोष्टींची दखल

वाढत्या गरमीत वर्कआऊट करत असताना फिट राहण्यासाठी जास्त तास वर्कआऊट करणं टाळा. जास्त घाम गेल्याने आणि पुरेसं शरिराला पुरेसं पाणी न मिळाल्यास त्याचे दुष्परिणाम होवू शकतात.

जिममध्ये वर्कआऊट करत असताना तुम्हाला अचानक धडधड वाढली असल्याचं जाणवल्यास तसचं छातीत हलकंसही दूखू लागल्यास लगेच वर्कआऊट बंद करून विश्रांती घ्या. तसचं डिहाइड्रेशनमुळे मरळग आल्याने भोवळ येण्याची शक्यता असते.

त्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटत असल्यास एक्सरसाइज करू नका. उन्हाळ्यात तुम्ही आजारी झाला असाल तर लगेचच पुन्हा जिम सुरू करू नका. काही दिवस विश्रांती घ्या. 

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शक्य झाल्यास घरीच एक्सरसाइज करू शकता. याशिवया ज्यांना दमा किंवा हृदयाशी निगडीच काही समस्या असतील त्यांनी वॉकिंग, जॉगिंग करणं कधीही उत्तम.

जिम करत असताना पुरेसं पाणी पिणं जितकं गरजेचं आहे. तितकच महत्वाचं पौष्टिक आहार घेणं आहे. उन्हाळ्यात हलका आहार घेत असला तरी तो पौष्टिक असेल याकडे लक्ष द्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.