Indian Borage सर्दी-खोकला, त्वचेच्या समस्यांपासून मुक्तता हवीय? जाणून घ्या या आयुर्वेदिक रोपाचे आरोग्यदायी महत्त्व

इंडियन बोरेज या आयुर्वेदिक रोपाचा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दैनंदिन जीवनात वापर केल्यास कित्येक आरोग्यदायी लाभ मिळू शकतात.
Indian Borage Health Benefits
Indian Borage Health BenefitsSakal
Updated on

आयुर्वेदमध्ये अशा कित्येक औषधी वनस्पती आहेत, ज्यांचा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दैनंदिन जीवनात समावेश केल्यास आरोग्यास भरपूर लाभ मिळू शकतात. विशेष म्हणजे एकाच वनस्पतीमुळेही वेगवेगळ्या शारीरिक विकारांपासून मुक्तता होण्यास मदत मिळू शकते. 

अशाच एका आयुर्वेदिक वनस्पतीची माहिती या लेखाद्वारे आपण जाणून घेणार आहोत. इंडियन बोरेज (Indian borage) ही वनस्पती आयुर्वेदानुसार दोडापत्र या नावाने ओळखली जाते.  सर्दी-खोकला, त्वचेशी संबंधित समस्या असल्यास या रोपाचा वेगवेगळ्या स्वरुपात औषधोपचार म्हणून वापर केला जातो.

Indian Borage Health Benefits
Fasting Tips : दिवसभर उपवास केल्यानंतर लगेचच खाऊ नका हे पदार्थ, आरोग्यावर होतील दुष्परिणाम

डॉ. पूर्वी भट (Dr.Poorvi Bhat) यांनीही इंस्टाग्रामवर या रोपाची माहिती देणारा व्हिडीओ शेअर केला आहे. जाणून घेऊया त्यांनी नेमके काय सांगितले… 

Indian Borage Health Benefits
Health Care News: वेट लॉस आणि फॅट लॉस यात काय फरक आहे? जाणून घ्या

वाफ घ्यावी

सर्दी झाली असल्यास किंवा छातीमध्ये जळजळ होत असल्यास दोडापत्र रोपाचे एक पान घ्या आणि स्टीमरमध्ये टाकून त्याची वाफ घ्यावी. पण केवळ एकाच पानाचा वापर करावा. एकापेक्षा अधिक पानाचा वापर करणं टाळावे. तसेच वापरलेल्या पानाचा पुन्हा वापर करणं टाळावे. 

Indian Borage Health Benefits
Health Care News: गोड खाऊन लगेच पाणी पिण्याची चूक करताय? थांबा, वाचा याचे दुष्परिणाम…

आरोग्यवर्धक चटणी

सर्दी खोकला झाल्यास आपण या रोपाच्या पानापासून चटणी देखील तयार करू शकता. 

सामग्री 

  • दोडापत्रची ताजी पाने (Indian Borage):  पाच ते सहा

  • किसलेले ओले खोबरे : अर्धा कप 

  • काळीमिरी : अर्धा चमचा 

  • जिरे : एक चमचा

  • हिरवी मिरची चवीपुरती 

  • भिजवलेली चिंच : अर्धा चमचा 

  • मीठ चवीनुसार 

  • लिंबाचा रस आवश्यकतेनुसार 

कशी तयार करावी चटणी?

  • गॅसच्या मंद आचेवर एका पॅनमध्ये दोडापत्रची पाने भाजून घ्या. यानंतर पॅनमध्ये सर्व मसाले मिक्स करावेत. 

  • सर्व सामग्री व्यवस्थित भाजून झाल्यानंतर गॅस बंद करावा. 

  • सर्व सामग्री मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यामध्ये चिंच, मीठ आणि खोबरे देखील मिक्स करा. 

  • चटणी वाटून झाल्यानंतर लिंबाचा रस त्यामध्ये मिक्स करावा.

  • तयार आहे आरोग्यवर्धक चटणी 

कफचा त्रास होत असेल तर आपण दोडापत्राचे चाटण देखील तयार करू शकता. यामध्ये थोडेसे मध देखील मिक्स करावे. दोडापत्रचे अर्धे पान घ्या आणि खलबत्तामध्ये व्यवस्थित कुटा. कुटलेल्या पानामध्ये थोडेसे मध मिक्स करा. या चाटणामुळे सर्दी-कफची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते.

दरम्यान डॉ. पूर्वी भट यांनी या पानांचे अति प्रमाणात सेवन न करण्याचाही सल्ला दिला आहे. कारण यामुळे शरीरात उष्णता निर्माण होण्याची शक्यता असते आणि यामुळे आरोग्यास अपाय होऊ शकतो. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()