Health Tips : ५ प्रॉब्लेम्स, १ सोल्युशन; अनेक आजारांवर प्रभावी आहेत 'या' बिया

पोटाचे विकार, केसांच्या समस्या, मूतखडा अशा अनेक आजारांवर या बिया फायदेशीर आहेत.
Health Tips
Health Tipsesakal
Updated on

Acidity and Other Health Problems : ॲसिडिटी, पोटाचे विकार, केसांच्या समस्या, मूतखडा अशा अनेक आजारांवर काकडी/मगज बिया फायदेशीर आहेत. या बिया कोठेही सहज उपलब्ध असतात. यामुळे पोट साफ राहील, केसांचे गळणे थांबेल, किडनी स्वछ होईल व किडनीतील मूतखडा म्हणजेच स्टोन पडून जाईल. तर अशा या गुणकारी कशा पद्धतीने वापरायच्या जाणून घेऊ.

Health Tips
Health : तुम्हाला सारखी भूक लागते का ? मग हे कराच

शास्त्रीय गुणधर्म

मगज बियांमधील काही घटक किडनी मधील मूतखडा विरघळून बाहेर काढण्याचे काम करतात. या बिया किडनी आतून स्वछ करतात. बियांमध्ये सल्फरची मात्रा अधिक प्रमाणात असते त्यामुळे केसगळती कमी होण्यास मदत होते.

Health Tips
Health Tips : सेक्स करताना वेदना होत असतील तर करा 'हे' उपाय

तोंडाच्या आरोग्यासाठी

या बिया तोंडातील अनावश्यक बॅक्टेरिया कमी करतात. त्यामुळे तोंडाची दुर्गंधी कमी होते. त्याचप्रमाणे यामुळे दात व हिरड्या मजबूत होण्यास मदत होते. दात किडत नाहीत.

Health Tips
Health Tips : प्री-डायबिटीज रिकव्हर होऊ शकतो का? ; या घरगुती उपायांनी शुगर करा कंट्रोल!

त्वचेसाठी उपयुक्त

यामध्ये अँटी-एजिंग एजेंट त्याचप्रमाणे अँटी-ऑक्साइडेस मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे त्वचा कोमल व मुलायम राहावे. तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. त्वचेसाठी ह्या रामबाण आहेत.

Health Tips
Health Tips : आईचे दुध वाढवण्यासाठी ‘हे’ आयुर्वेदीक तेल वापरून बघाच!

मूतखडा बाहेर निघून जाण्यासाठी

ज्या व्यक्तिना मूतखडा झाला आहे. त्यांनी या बिया २ चमचे घेऊन त्यात २ वेलदोडे म्हणजेच वेलचीचे दाणे टाकावेत. या दोन्ही वस्तु सकाळी उपाशीपोटी चावून चावून खाव्यात, ५-७ दिवसात मूतखडा निघून जाईल.

Health Tips
Health Tips : जेवताना पाणी प्यावे की नको? ऐका तज्ज्ञांचा सल्ला

पित्त व ॲसिडिटीसाठी

ज्या व्यक्तिना पित्त किंवा ॲसिडिटी ही समस्या आहे त्या लोकांनी याल २ चमचा बिया व एक छोटा खडीसाखर तुकडा एकत्र करून चावून चावून खावा. दिवसभरात तुम्ही केव्हाही खाऊ शकता. पित्त कमी होण्यास मदत होते.

Health Tips
Health Tips : व्हिटामिन बी १२ चे फायदे?

वजन कमी करण्यासाठी

ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांच्यासाठी या बिया उपयुक्त आहेत कारण या बियांमध्ये कॅलरीज कमी असतात व फायबरचे प्रमाण जास्त असते. फायबर वजन कमी करण्यासाठी खूपच महत्वाचे आहे. दिवसभरात या बिया २०-२५ ग्राम चावून चावून खा. वजन नक्की कमी होईल.

Health Tips
Health Tips : आजीबाईचा बटवा वापरा; पण जरा जपून

इतर अनेक आजारांवर याचा उपाय सोपा आहे.

  • या बिया दिवसभरात जेव्हा वेळ असेल, तेव्हा १ ते २ चमचे चावून खाऊन त्यावर पाणी प्यायचे आहे. या तुम्ही जेवणासोबत पण घेऊ शकता.

  • ३ वर्षांपासून वृद्ध व्यक्तिपर्यंत या बिया कोणीही सेवन करु शकते. याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

  • तरुण दिसण्यासाठी व राहाण्यासाठी या बियांचा जरूर वापर करून बघा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.