Spinach Water Benefits: पालक शिजवल्यानंतर चुकूनही फेकू नका पाणी, हे पाणी पिण्याचे फायदेच फायदे

पालकचं पाणी तुम्हाला अनेक पोषक तत्व देऊ शकतं त्यामुळे हे पाणी न फेकता. त्याचं सेवन केल्यास आरोग्यास अधिक फायदा होईल
Spinach Water Benefits
Spinach Water BenefitsEsakal
Updated on

Spinach Water Benefits: सर्वच पालेभाज्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात हे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. खास करून पालकचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यासाठीच अनेकजण आवर्जुन आहाराच पालक समाविष्ट करतात.

शिवाय घरातील सर्वांनीच अगही लहान मुलांनी देखील पालक खावं म्हणून मग पालकचे वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. Health Tips Marathi Benefits of Spinach water to Human Body

यात पालक पराठे Paratha, डाळ-पालक. पालक पनीर किंवा आलू पालक, पालक सूप अशा वेगवेगळ्या रेसिपी ट्राय केल्या जातात. तर काहीजण कच्च्या पालकचा ज्युसदेखील Spinach Juice पितात. अनेकजण पालक शिजवूनच खावं असा सल्ला देतात. 

पालकमध्ये अनेक पोषक तत्व आहेत. यात व्हिटॅमिन ए Vitamin A, बी, सी तसचं आयरन, कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशिय आणि डायट्री फायबरचं प्रमाण मुबलक प्रमाणात आढळतं. बऱ्याचदा पालक पनीर किंवा पालक सूप बनवताना पालक शिजवून झाल्यानंतर उरलेलं पाणी फेकून दिलं जातं.

मात्र पालकचं पाणी देखील तुम्हाला अनेक पोषक तत्व देऊ शकतं त्यामुळे हे पाणी न फेकता. त्याचं सेवन केल्यास आरोग्यास अधिक फायदा होईल. पालकच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात माइक्रोन्यूट्रीएंटस् असतात. पालकचं पाणी प्यायल्याने शरिराला कोणकोणते फायदे होतात ते जाणून घेऊयात. (Spinach water benefits)

 रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत- पालकच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट उपलब्ध असल्याने यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यातील प्रोटीन आणि माइक्रोन्यूट्रिएंटमुळे शरीरातील ऑक्सीडेटिव स्ट्रेस आणि जुने आजार बरे होण्यास मदत होते.

हे देखिल वाचा-

Spinach Water Benefits
Health Tips : किचनमधील हा मसाला करेल तुमची BP ची कायमची गोळी बंद?

रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत- पालकच्या पाण्यात नाइट्रेट्सचं प्रमाण जास्त असतं. यामुळे रक्तदाब कमी होवून तो नियंत्रात ठेवण्यास मदत होते.  तसंच यामुळे हृदयाशी संबंधीत धोका कमी होण्यास मदत होते. (Spinach water controls blood pressure)

कॅन्सरचा धोका टळतो- पालकचं पाणी ज्याप्रमाणे हृदयाचं स्वास्थ चांगलं ठेवण्यास फायदेशीर ठरतं त्याचप्रमाणे कॅन्सरचा धोका कमी होण्यासही मदत करतं. तज्ञांच्या मते हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश केल्याने वजन तर कमी होतंच शिवाय फुफ्फुस, प्रोस्टेट, कोलेस्ट्रॉल आणि कॅन्सरचा धोकाही कमी होते.

पोटांच्या समस्या दूर- डाइट्री फायबरचं प्रमाण जास्त असल्याने पालकचं पाणी किंवा ज्युस हा पोटासाठी फायदेशीर ठरतं. हे आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियाचं संतुलन राखण्यास मदत करतं. त्याचप्रमाणे पचनशक्ती सुधारण्यास मदत करत. पोट फुगणे, बद्धकोष्ठता, सूज तसचं गॅसच्या पोटाशी संबंधित अन्य समस्या दूर करण्यासाठी पालकचं पाणी उपयुक्त ठरतं.

रक्त वाढण्यास फायदेशीर- पालकमध्ये मोठ्या प्रमाणात आयरन उपलब्ध असतं. यामुळे शरिरात रक्त वाढण्यास दत होते. पालकच्या पाण्यामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढण्यास आणि हीमोग्लोबिनची पातळी नियंत्रणात राखण्यास मदत होते. ज्या व्यक्तींमध्ये रक्ताची कमतरता जाणवते त्यांनी नियमितपणे पालकच्या पाण्याचं सेवन करावं. 

त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त- पालकचं पाणी हे एक उपयुक्त डिटॉक्स ड्रिंक आहे. याच्या सेवनाने शरिरातील टॉक्सिन म्हणजेच विषारी पदार्थ नष्ट करण्यास मदत होते.

पालकमधील अँटीऑक्सिडंटमुळे त्वचेसंबधीत समस्या दूर होतात आणि चेहऱ्यावर ग्लो येतो. (Spinach water for glowing skin तसंच पालकमधील आयर्नमुळं केसांसंबंधीत अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. 

डोळ्यांसाठी उपयुक्त- पालकमध्ये ल्यूटिन आणि जेक्साथिन सारखे अँटीऑक्सिडंटस् उपलब्ध असतात. तसचं यातील व्हिटॅमिन ए मुळे दृष्टी चांगली होण्यास मदत होते. विटामिन ए ची कमतरता निर्माण झाल्यास डोळे कोरडे होणं तसचं रातांधळेपणाचा धोका वाढतो. मात्र पालकच्या पाण्याच्या सेवनाने हा धोका कमी करणं शक्य आहे. 

हे देखिल वाचा-

Spinach Water Benefits
Healthy Diet : दह्यासोबत 'या' गोष्टी चुकूनही खाऊ नका

पालकच्या पाण्याचं सेवन कसं करावं-

पालक पनीर किंवा पालकची ग्रेवी बनवण्यासाठी पाण्यामध्ये पालक शिजवून घेतलं जातं. त्यानंतर उरलेलं पाणी फेकून देऊ नये. हे पाणी एका ग्लासात गाळून घ्याव. 

या पाण्यात मीठ किंवा चिमूटभर काळं मीठ आणि मिरपूड घालून या पाण्याचं सेवन करावं हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()