Drinking Water: सकाळी उठताच पाणी पिण्याचे चमत्कारिक फायदे, आजच करा सुरुवात

Drinking Water in the Morning: सकाळी झोपेतून उठल्यानंतर सर्वप्रथम पाणी पिणं गरजेचं असतं. पाणी न पिताच चहा किंवा कॉफी प्यायल्याने पित्त, गॅस किंवा इतर अनेक समस्या निर्माण होवू शकतात
Benefits of Drink Water in Morning
Benefits of Drink Water in MorningEsakal
Updated on

Benefits of Drink Water in Morning: अनेकजणांची सकाळची सुरुवात चहा किंवा कॉफीने होते. अगदी ब्रश केल्यानंतर किंवा काहीजण तर ब्रश न करताच चहा किंवा कॉफिचं सेवन करतात. Health Tips Marathi Drink water first instead of Tea Coffee in morning

तर काहीजण आरोग्यासाठी फायदा होईल या विचाराने सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी एखाद्या फ्रूट ज्यूस Fruit Juice म्हणजेच एखाद्या फळाचा ताजा किंवा पॅकमधील ज्यूस पितात. तर काही जण फळ Fruit खाणं पसंत करतात. मात्र यामुळे शरीराचं नुकसान होवू शकतं.

सकाळी झोपेतून उठल्यानंतर सर्वप्रथम पाणी पिणं गरजेचं असतं. पाणी न पिताच चहा किंवा कॉफी प्यायल्याने पित्त, गॅस किंवा इतर अनेक समस्या निर्माण होवू शकतात. शरीरात ७० टक्के पाणी असतं.

शरीराचं कार्य सुरळीत चालण्यालाठी पाणी गरजेचं असतं. खरं तर रात्री आपण झोपलो असलो तरी आपल्या शरीरात अनेक प्रक्रिया सुरु असतात. ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी झालेली असते.

सकाळी उठताच शरीराला पाण्याची अधिक आवश्यकता असते. यासाठी सकाळी उठताच किमान एक ग्लास तरी पाणी प्यावं. यामुळे शरीर डिहायड्रेट Dehydration होण्याचा धोका टळेल.

तसचं शरीरातील रासायनिक प्रक्रियेसाठी पाण्याची आवश्यकता असल्याने सकाळी उठल्यानंतर आधी चहा कॉफी किंवा ज्यूस पिण्याएवजी साधं पाणी पिणं हा एक आरोग्यदायी पर्याय आहे. सकाळी पाणी पिण्याचे इतर फायदे पाहुयात

हे देखिल वाचा-

Benefits of Drink Water in Morning
Sugarcane Juice: रिकाम्या पोटी उसाचा रस पिण्याचे अनेक फायदे, जाणून घ्या

१. शरीर स्वच्छ होण्यास मदत- पाणी हे एखाद्या क्लिंजरप्रमाणे आपल्या शरीरात काम करतं. सकाळी उठल्या उठल्या पाणी प्यायल्य़ाने शरीरात साचलेले टॉक्सिन म्हणजेच विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.

शरीरातील पाण्याच्या पातळीचं संतुलन राखून शरीर डिटॉक्स करण्याच काम पाणी करतं. यामुळे एका प्रकारे शरीराचं क्लिनिंग म्हणजेच स्वच्छता होण्यास मदत होते.

तसचं सकाळी उठल्यानंतर शरीराचं तापमान संतुलित राखण्यासाठी देखील पाणी पिण्याचा फायदा होतो. तसचं शरीलातील सगळ्या रसायनांचं नियंत्रण राखण्यासही यामुळे मदत होते. यामुळे पित्त किंवा गॅस सारखी समस्या होत नाहीत.

२. त्वचेवर चमक येते- सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. पाण्यामुळे रक्तप्रवाह वाढण्यास आणि नव्या रक्तपेशी तयार होण्यास मदत होत असल्याने त्वचेवर skin glow येतो. तसचं चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

३. चयापचय क्रिया सुधारते- रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यावने चयापचय क्रिया सुधारण्यास मदत होते. यामुळे वजन कमी होण्यासही मदत होवू शकते. त्यामुळेच ज्यांन वजन कमी करायचं आहे. त्यांनी सकाळी उठल्यानंतर पाणी पिणं गरजेचं आहे.

सकाळी पाणी प्यायल्याने मोठी आतडी स्वच्छ होतात.ज्यामुळे शरीराला पोषक द्रव्य शोषून घेण्यास मदत होते.

४ मूतखडा आणि युरीन इंफेक्शनचा धोका कमी- पाण्यामुळे पोटातील आम्लता कमी होवून मूतखड्याचा धोका कमी होते. तुम्ही सकाळी उठून जितकं पाणी प्याल तितकेच विषारी पदार्थ तुमच्या शरीरातून बाहेर पडण्यास मदत होईल. यामुळे युरीन इंफेक्शनचा धोका कमी होईल.

५. बद्धकोष्ठता होईल दूर- बद्धकोष्ठतेची समस्या असलेल्यांनी सकाळी उठल्यानंतर किमान २ ग्लास तरी पाणी प्यावं. नियमितपणे पाण्याचं सेवन केल्यास लवकरच बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल. यामुळे मल उत्सर्जनास कोणताही त्रास देखील होणार नाही.

सकाळी उठल्यावर सर्वप्रथम पाणी प्यायल्याने शरीराला अनेक इतरही फायदे होतील. सकाळी उठल्यावर पाणी प्यायल्याने मासिक पाळी, लघवी, घसा आणि किडनीशी संबंधित समस्यां दूर होण्यास मदत होईल.

त्याचप्रमाणे सकाळा पाणी प्यायल्याने स्नायूंमधील वेदना कमी होऊन ते मजबूत होतात. शिवाय शरिरामध्ये नव्या पेशी तयार होण्यास मदत होते.

यामुळे सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी कोणताही पदार्थ किंवा इतर पेय पिण्याएवजी सर्वप्रथम पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.