Weight loss साठी रात्रीचं जेवण स्किप करत असाल तर हे नक्की वाचा, आरोग्यासाठी ठरू शकतं हानिकारक

केवळ रात्रीचं जेवणचं नव्हे तर सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण हे तीनही योग्य वेळेत करणं गरजेचं आहे. रात्रीचं जेवण न केल्यास आरोग्यावर काय परिणाम होवू शकतो हे जाणून घेतल्यास कदाचित तुम्ही डिनर स्किप करण्याची चूक अजिबात करणार नाही
रात्रीचे जेवळ हवेच
रात्रीचे जेवळ हवेचEsakal
Updated on

वजन कमी करण्यासाठी अलिकडे अनेकजण विविध प्रकारचे डाएट आणि व्यायाम करत असतात. मग कधी केवळ फलाहार करणं असो तर कधी केवळ भाज्या आणि सूप पिऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न सुरु असतो. Health Tips Marathi it is dangerous to skip night meal for weight loss

अनेकजण तर वजन कमी करण्यासाठी रात्रीचं जेवण Night Meal करणंच टाळतात. रात्रीच्या जेवणामुळे वजन वाढतं Weight Gain अशी अनेकांची धारणा असते म्हणून वजन कमी कऱण्यासाठी काही रोज न जेवताच झोपतात.

वजन कमी करण्याच्या उद्देशाने असो किंवा अनेकजण कामावरून आल्यावर थकल्यामुळे किंवा इतर काही कारणांमुळे जरी रात्रीचं जेवण Dinner स्किप करत असतील तर ते आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं कारण यामुळे वजन कमी होण्याएवजी अनेकदा इतर समस्या निर्माण होवू शकतात.

केवळ रात्रीचं जेवणचं नव्हे तर सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण हे तीनही योग्य वेळेत करणं गरजेचं आहे. रात्रीचं जेवण न केल्यास आरोग्यावर काय परिणाम होवू शकतो हे जाणून घेतल्यास कदाचित तुम्ही डिनर स्किप करण्याची चूक अजिबात करणार नाही.

शरीरात पोषक तत्वांची कमरतता

जर तुम्ही केवळ वजन कमी करावं Weight Loss या उद्देशाने रात्रीचं जेवण स्किप करत असाल, तर ही एक मोठी चूक ठरू शकते. कारण रात्रीचं जेवण न जेवल्याने शरीरामध्ये न्यूट्रियंट्स म्हणजे पोषकतत्वांची कमतरता निर्माण होवू शकते. शरीराला आवश्यक पोषकतत्व न मिळाल्याने आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होवू शकतात.

तसंच शरीरात विविध व्हिटॅमिन्सची कमतरता निर्माण होणं आणि रक्ताची कमतरता निर्माण होणं अशा समस्या निर्माण होवू शकतात.

हे देखिल वाचा-

रात्रीचे जेवळ हवेच
Unintentional Weight Loss : पोटभर जेऊनही सतत भूक लागतेय, वजनही झपाट्याने कमी होतंय असं का?

थकवा येऊ शकतो

वजन कमी करण्यासोबत अनेकजण रात्री जेवण बनवण्याचा कंटाळा येत असल्याने रात्रींचं जेवण करणं टाळतात. मात्र सतत रात्रीचं जेवण स्किप केल्याने तुमची एनर्जी लेवल कमी होवू शकते. रात्री जरी आपण कोणतही काम करत नसलो तरी मेंदूचं कार्य सुरू राहत असल्याने शरीराला एनर्जीची आवश्यकता असते.

रात्रीचं जेवण न केल्याने उर्जेची कमतरता निर्माण होवून दुसऱ्या दिवशी तुम्हाला थकवा येऊ शकतो. तसंच सतत जर तुम्ही रात्री जेवला नाहीत तर तुम्हाला दीर्घकाळासाठी अशक्तपणा येऊ शकतो.

झोपेवर परिणाम

रात्री उपाशी झोपल्याने तुम्हाला मध्यरात्री कदाचित भूक लागू शकते. उपाशी झोपल्याचा तुमच्या झोपेच्या चक्रावर sleeping cycle परिणाम होतो. यामुळे तुम्हाला ८ तासांची गरजेची असलेली शांत झोप मिळणार नाही. यामुळे तुमचं मानसिक आरोग्य बिघडू शकतं. तसचं रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनक्रियेवरही परिणाम होवू शकतो.

गोड खाण्याची इच्छा

जेव्हा तुम्ही रात्रीचं जेवण स्किप करून उपाशी झोपी जाता तेव्हा तुम्हाला अनेकदा रात्री भूक लागून काहीना काही खाण्याची इच्छा होते. अनेकादा जास्त वेळ उपाशी राहिल्याने ब्लड शुगर लो होते आणि गोड पदार्थ किंवा कार्बस् खाण्याची इच्छा जागृत होते.

यामुळे तुम्ही सकाळी उठून किंवा दिवसा गोड खाण किंवा इतर जंक फूड जास्त प्रमाणात खावू शकता. तसचं रात्री उठूनही चुकीचे पदार्थ खावू शकता. यामुळे वजन कमी होण्याऐवजी ते वाढू शकतं.

तणाव, चिंता वाढून मानसिक आरोग्य धोक्यात

जर एखादी व्यक्ती सतत रात्रीचं जेवण करणं टाळत असेल तर त्याचा शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. यामुळे तणाव वाढू शकतो. यामुळे अँक्झायटी लेव्हल वाढू शकते आणि ब्लड शुगर कमी झाल्याने कोर्टिसोल या स्ट्रेस हार्मोनचं प्रमाण वाढू लागतं.

यासाठीच रात्रीचं जेवण स्किप करणं हा एक चुकीचा पर्याय ठरू शकतो. त्याएवजी तुम्ही रात्रीचं जेवण लवकर करणं तसंच रात्री हलका आहार घेणं असे पर्याय निवडू शकता. ज्यामुळे तुमच्या शरीराला गरजेची पोषकतत्वं मिळतील आणि वजन कमी होण्यासही मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.