Sugar Intake एकदम कमी केला तर काय होईल? फायदा की नुकसान घ्या जाणून

sugar control tips: साखरेचं सेवन कमी केल्यास तुमच्या शरीराला नेमके फायदे होतील की नुसकान हे आज आपण जाणून घेणार आहोत. शिवाय यासाठी तुम्ही देखील शुगर चॅलेंज घेऊन स्वत: याचा अनुभव घेऊ शकता
sugar control tips in marathi
sugar control tips in marathi Esakal
Updated on

भारतातील प्रत्येक घरामध्ये दिवसाची सुरुवात ही साधारणपणे चहाने होते. मग तो चहा दुधाचा असो किंवा ब्लॅक टी. अनेकांना सकाळी उठल्यानंतर चहा प्यायलं नाही तर दिवसभर काम करणं कठिण जातं. Health Tips Marathi Know about sugar intake and impact on body

चहा Tea म्हणजेच दिवसाची सुरुवातच आपण साखरयुक्त पेयाने करत असतो. खरं तर दिवसभरामध्ये चहा किंवा इतर अनेक पदार्थांच्या माध्यमातून आपण दिवसभरामध्ये मोठ्या प्रमाणात साखरेचं सेवन Sugar Intake करत असतो. 

आरोग्य तज्ञांनुसार आपल्या शरीरासाठी साखर आणि मीठ Salt हे दोन्ही हानिकारक आहेत. जास्त प्रमाणामध्ये मिठाचं सेवन केल्यास शरीरात सोडियमचं Sodium प्रमाण वाढून उच्च रक्तदाब आणि परिणामी हृदय विकारांचा धोका वाढतो. तर साखरेच्या अति सेवनाने रक्तातील साखरेची पातळी आणि सोबतच वजन वाढण्याची शक्यता जास्त असते. 

अनेकजण आपल्याला रक्तदाब किंवा मधुमेहाची समस्या नाही असा विचार करून बिनधास्त गोड पदार्थ किंवा साखर असलेल्या पदार्थांचं सेवन करतात. मात्र जरी तुमची ब्लड शुगर कंट्रोलमध्ये असली तरी साखरेचं सेवन जास्त करणं भविष्यामध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण करणारं ठरू शकतं. 

साखरेचं सेवन कमी केल्यास तुमच्या शरीराला नेमके फायदे होतील की नुसकान हे आज आपण जाणून घेणार आहोत. शिवाय यासाठी तुम्ही देखील शुगर चॅलेंज घेऊन स्वत: याचा अनुभव घेऊ शकता. 

हे देखिल वाचा-

sugar control tips in marathi
Drinks For Blood Sugar : Blood Sugar आऊट करायची नसेल तर आत्ताच हे स्पेशल ड्रिंक्स सुरू करा!

३० दिवसांसाठी शुगर चॅलेंज

तुम्ही स्वत:साठी नो शुगर चॅलेंज No Sugar Challenge स्विकारू शकता. महिनाभरासाठी तुम्ही आहारातून साखरेला काढून टाका आणि परिणाम पहा. यावरून साखरेचे फायदे की तोटे हे तुमच्या लक्षात येईल. 

आहारातून साखर काढून टाकणं म्हणजेच साखरेसोबत अॅडेड शुगर असलेल्या पदार्थांचं सेवन देखील न करणं. यात बिल्किटं, केक, पेस्ट्री, सॉफ्ट ड्रिंक्स, टेट्रा पॅकमधील ज्यूस असे सर्व पदार्थ आहारातून काढून टाका. त्याएवजी पोषक  तत्व असलेल्या भाज्या , फळं, फळांचे ताजे रस अशा कमी साखर असलेल्या पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा. 

साखर कमी केल्यास काय होईल परिणाम ?

आरोग्य तज्ञांच्या मते आहारातून साखर काढून टाकणं हे शरीरासाठी केव्हाही फायदेशीर ठरू शकतं. आहारात कमीत कमी अॅडेड शुगरचं सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. शिवाय फळं आणि भाज्यांमधील नैसर्गिक साखर शरिरासाठी हानिकारक नसते. 

यामुळे मधुमेह आणि वजन वाढण्याची चिंता नसते. ३० दिवसांसाठी जर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी करून पोषक आहार घेतल्यास तुम्हाला फिटनेस जाणवू लागेल. तसचं कमी फ्रुक्टोज असलेल्या पदार्थांचं सेवन केल्यास लिव्हरमधील फॅट्स दूर होतात. 

हे देखिल वाचा-

sugar control tips in marathi
Diet Plan For Diabetes : मधुमेह असलेल्या लोकांनी या पदार्थांशी गट्टी जमवावी; Blood Sugar होईल छुमंतर!

आहारातून साखर कमी केल्यास आरोग्याला नुकसान होईल का?

आहारातून साखरेचं प्रमाण कमी केल्यास शरीरावर कोणतेही प्रतिकूल परिणाम दिसून येत नाही. यासाठी केवळ आहारामध्ये इतर पौषक पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे.

जर तुम्ही साखरेसोबतच कार्ब्स असलेले पदार्थही आहारातून कमी करत असाल, तर मात्र तुम्हाला लो शुगरची समस्या निर्माण होवून अशक्तपणा येऊ शकतो. यासाठीच ३० दिवस तुम्ही आहारातील साखर कमी करून त्याएवजी पोषक आणि संतुलित आहार घेतल्यास आरोग्याला त्याचे अनेक फायदे मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.