Best Time to Eat: रात्री उशीरा जेवताय मग वेळीच बदला सवय, उशीरा Dinner मुळे होऊ शकतात हृदयाचे आजार

भूकेसाठी आपल्या शरीरात ग्रलीन हार्मोन विशेष भूमिका बजावत असतात. हे हार्मोन्स तुमच्या मेंदुला भूक लागल्याचे संकेत देत असतात. कायम एकाच वेळी आणि योग्य वेळेत जेवल्याने हे हार्मोन्स योग्य रितीने काम करतात
Best Time to Eat
Best Time to EatEsakal
Updated on

Best Time to Eat: निरोगी राहण्यासाठी जसं योग्य आहार आणि व्यायाम गरजेचा आहे. तसचं तो योग्य आहार Meal वेळेत घेणं देखील तितकचं गरजेचं आहे. कोणत्याही वेळी जेवल्याने खास करून रात्री उशीरा जेवण Late Night Dinner केल्याने हृदयासंबंधीत गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते.

तसच यामुळे मधुमेहाचा Diabetes धोका देखील बळावतो. एकंदरच रात्री उशीरा जेवल्याने आरोग्याच्या अनेक तक्रारींना आपण निमंत्रण देत असतो. Health Tips Marathi Late Night Dinner not good for metabolism and heart

अलिकडे बदललेल्या जीवनशैलीमुळे Lifestyle जेवणाच्या आणि झोपेच्या वेळांवर परिणाम झाला आहे. आपलं शरीर हे एका खास पद्दतीच्या रिदमवर चालत असतं.

तुमच्या जीवन शैलीचा या बॉडी रिदमवर परिणाम होत असतो. रात्री उशीरा जेवणं Late Night Meal आणि उशीरा झोपणं Late Sleep यामुळे शरीराच्या संपूर्ण सिस्टमवर दुष्परिणाम होतो आणि आजारांचा धोका बळावतो. 

योग्य वेळी जेवणं आरोग्यासाठी गरजेचं 

अनेकजण चांगल्या आरोग्यासाठी, तसचं वजन कमी करण्यासाठी सकस आणि पौष्टिक तसच कमी कॅलरीज असलेला आहार घेतात. मात्र हा आहार घेण्याची एक वेळ ठरलेली नसते.

अनेकदा दुपारचं जेवण केलं जात नाही. तर काही वेळा खूप उशीरा दुपारचं जेवण केल्याने रात्रीचं जेवणही उशीरा होतं. या सर्वाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो. 

भूकेसाठी आपल्या शरीरात ग्रलीन हार्मोन विशेष भूमिका बजावत असतात. हे हार्मोन्स तुमच्या मेंदुला भूक लागल्याचे संकेत देत असतात. कायम एकाच वेळी आणि योग्य वेळेत जेवल्याने हे हार्मोन्स योग्य रितीने काम करतात. मात्र जेवणाच्या वेळा बदलल्याने हार्मोन्सची कार्यप्रणाली बिघडून त्याचा शरीरावर दुष्परिणाम होतो. 

रात्री उशीरा जेवणं शरीरासाठी नुकसानदायक-

तज्ञांच्या अभ्यासानुसार रात्री उशीरा जेवल्याने चयापचय क्रिया आणि ब्लड शुगर या दोन्हीवर नकारात्मक परिणाम होवू शकतो. दिवसा किंवा दुपारी उशीरा जेवल्याने ब्लड ट्रायग्लिसराइड वाढून हृदया रोगांचा धोका वाढतो. 

चुकीच्या वेळी जेवल्याने सर्व प्रथम तुमच्या मेटाबोलिज्म म्हणजे चयापचय क्रियेवर थेट परिणाम होतो. यामुळे पचनक्रिया बिघडते. परिणामी गॅस,जळजळ या सामान्य समस्यांपासून वजन वाढण्याची शक्यता वाढते.  Late night dinner disadvantage 

रात्री उशीरा जेवणाचे ४ मोठे दुष्परिणाम

मधुमेह आणि हृदयाच्या समस्या- अमेरीकेतील संशोधकांच्या एका संशोधनानुसाक रात्री उशिरा खाल्ल्याने इन्सुलिन, फास्टिंग ग्लुकोज, कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडची पातळी वाढते. ग्लुकोज आणि इन्सुलिनची वाढलेली पातळी ही प्रीडायबिटीस आणि शेवटी मधुमेहासाठी जबाबदार ठरते. 

रात्री उशिरा खाल्ल्याने तुमचे कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्स देखील वाढू शकतात, हे रक्तात आढळणारे चरबीचे प्रकार असून यामुळे हृद्या विकारांचा धोका वाढतो. Eating right times

वजन वाढणे- संशोधनानुसार रात्री उशीरा जेवणाऱ्याचं वजन हे लवकर जेवण करणाऱ्यांच्या तुलनेत जास्त असल्याचं आढळलं आहे.

पेरेलमन स्कूल ऑफ मेडिसिनच्या अभ्यासात असे आढळून आले की रात्री उशिरा खाल्ल्याने लोकांच वजन जास्त वाढते. कारण रात्री चरबी बर्न करण्याची क्षमता कमी होते. तसचं शरीरात कार्बोहायड्रेट साचलेले राहतात. त्यामुळे वजन वाढत. 

हे देखिल वाचा-

Best Time to Eat
Drinking Water With Meals : जेवताना पाणी पिणे चूक की बरोबर? काय म्हणतात तज्ज्ञ

ऍसिडीटी आणि जळजळ- रात्री उशीरा जेवून लगेच झोपल्याने ऍसिड रिफ्लॅक्स आणि छातीमध्ये जळजळ होवू शकते. संशोधक आणि तज्ञांच्या मते रात्रीचा आहार हा हलका असावा. तसचं रात्रीचं जेवण आणि झोपण्याची वेळ यामध्ये किमान २-३ तासांचं अंतर असणं गरजेचं आहे. 

हृदयविकाराचा धोका वाढतो-  मेयो क्लिनिकच्या मते रात्री तुमचा रक्तदाब सामान्यतः कमी असतो. तर सकाळी तुम्ही उठण्याच्या काही तासांआधी पासून रक्तदाब पुन्हा वाढण्यास सुरुवात होते. दररोज हे चक्र सुरू असतं. 

मात्र जेव्हा तुम्ही रात्री उशीरा जेवता त्याचा परिणाम तुमच्या या रक्तदाब चक्रावर आणि कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर होतो. मात्र रात्री उशीरा जेवल्याने त्याचा परिणाम तुमच्या रक्तदाबावर होतो.

तुमचं शरीर आराम करण्याएवजी ते सतत हाय अलर्ट मोडवर राहतं. परिणामी हृदयविकार आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.

रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ

तज्ञांच्या मते निरोगी राहण्यासाठी दिवसाची सुरुवात सकाळी लवकर उठण्याने करणं गरजेचं आहे. यामुळे संपूर्ण दिवसातील काम आणि आहार वेळेत होईल. तसचं रात्रीचं जेवण साधारण ८ वाजता करावं. रात्रीच्या जेवणानंतर झोपण्यापूर्वी कोणतेही पदार्थ किंवा पेयांचं सेवन टाळावं. 

रात्रीचं जेवण ते सकाळच्या नाश्त्यामध्ये १२ ते १४ तासांचा तरी अवधी अससावा. यामुळे शरीराची चयापचय क्रिया योग्य रितीने कार्य करते तसचं हार्मोन्स संतुलन राखलं जातं आणि मधुमेह किंवा हृदया विकारांसोबतच अनेक आजारांचा धोका कमी होतो. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()