Watermelonच्या मदतीने युरिक ऍसिडच्या समस्येवर करा मात, जाणून घ्या फायदे 

Uric Acid Control Tips: कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची मात्र असून यातील पोषक तत्व शरीरासाठी उपयुक्त ठरतात. यासोबत युरीक ऍसिडची समस्या दूर करण्यासाठी देखील कलिंगडाचे काय फायदे आहेत हे जाणून घेऊयात
uric acid control diet
uric acid control dietEsakal
Updated on

Uric Acid Control Diet: शरीरात युरिक ऍसिडचं नियंत्रण बिघडणं ही अलिकडे एक वाढत जाणारी समस्या निर्माण झाली आहे. मुळात, ही एक प्रकारची चयापचय प्रक्रियेशी संबंधित समस्या आहे.

यामध्ये तुमचं शरीर प्रोटीनमधून Protin निघणारं वेस्ट प्युरीन पचवू शकतं नाही. Health Tips Marathi Watermelon Benefits for Uric Acid Control

अशा स्थितीत हे प्युरीन हाडांमध्ये Bones दगडांच्या रूपात जमा होतं आणि त्यामुळे तुम्हाला गाउटची समस्या होऊ शकते. यासाठी कलिंगडाचं Watermelon सेवन हे अनेक प्रकरे फायदेशीर ठरू शकतं. 

uric acid control diet
Watermelon Seeds: थांबा... कलिंगडातील बिया फेकू नका, निरोगी Heart पासून मिळतील अनेक फायदे

कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची मात्र असून यातील पोषक तत्व शरीरासाठी उपयुक्त ठरतात. यासोबत युरीक ऍसिडची समस्या दूर करण्यासाठी देखील कलिंगडाचे काय फायदे आहेत हे जाणून घेऊयात. 

१. कलिंगड हे एक ड्युरेटिक फळ आहे म्हणजेच लघवीचं प्रमाण वाढवणारं हे एक फळ आहे. कलिंगडात मोठ्या प्रमाणात पाण्याचं प्रमाण असल्याने ते शरीरातील टॉक्सिन म्हणजेच विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करतात.

यामुळे शरीरातील प्युरीन मेटाबोलिजम जलद करण्यास मदत करतं आणि ते पाण्यासोबत शरीराबाहेर टाकण्यास मदत करतं. 

२. शरीरात पाण्याचं प्रमाण वाढल्यास चयापचय क्रिया जलद होण्यास मदत होते आणि सहाजिकच य़ामुळे आपलं शरीर वेळोवेळी डिटॉक्स होत राहतं.

त्यामुळे कलिंगडाच्या सेवनानंतर शरीरातील हायड्रेशन वाढण्यासोबतच चयापचय क्रिया वाढते. परिणामी शरीरातील प्रोटीन पचण्याची क्रिया सुरळीत चालते आणि यामुळे युरीक ऍसिड वाढण्याची शक्यता कमी होते. 

हे देखिल वाचा-

uric acid control diet
Mango In Uric Acid : युरिक अ‍ॅसिडचा त्रास असेल तर आंबा खावा की नाही?

3. जेव्हा हाडांमध्ये प्युरिन जमा होवू लागतं तेव्हा गाउटच्या अनेक समस्या निर्माण  होतात अनेकदा या समस्या वेदनादायी असू शकतात. मात्र जेव्हा तुम्ही कलिंगडाचं सेवन करता तेव्हा रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि पाण्यासोबत हे खडे फ्लश आउट होतात म्हणजेच शरीराबाहेर पडतात. यामुळे हाडांमध्ये हायड्रेशन राहतं. यामुळे गाउटमधील वेदना कमी करण्यास मदत होते. 

४. कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि पोटॅशियम उपलब्ध असतं. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ आणि घाण बाहेर फेकण्यास मदत होते. यातील कॅल्शियममुळे देखील युरिक ऍसिडचं प्रमाण कमी करण्यास मदत होते आणि किडनीच्या आजारांचाही धोका कमी होतो. 

युरिक ऍसिडची समस्या असल्यास कोणते पदार्थ टाळावे

- ज्या पेयांमध्ये किंवा पदार्थांमध्ये अल्कोहलचं प्रमाण जास्त असतं त्या पेयांच्या सेवनाने रक्तात युरिक ऍसिडचं प्रमाण वाढतं. यामुळे अशी पेय टाळावीत. खास करून बिअरमध्ये ऑग्जेलेट आणि युरिक ऍसिड अधिक प्रमाणात असचं ज्यामुळे या आजाराची शक्यता वाढते. 

- याच सोबत मांसाहारामध्ये बीफ, लॅम्ब आणि रेड मीटचं सेवन टाळावं. कारण यामध्ये प्यूरीनचं प्रमाण अधिक असतं. 

- आयस्क्रीम, सोडा आणि फास्ट फूट पदार्थांच्या अति सेवनाने देखील यूरीक ऍसिड वाढण्याची शक्यता असते. 

uric acid control diet
Watermelon थंडाव्याबरोबरच Face Pack म्हणूनही ठरेल उपयुक्त

- यूरिक ऍसिडचा त्रास असल्यास फूलकोबीचं सेवन करू नये. या भाजीच्या सेवनाने युरीक ऍसिडची पातळी वाढते. 

- तसचं काही सीफूडमुळे देखील युरीक ऍसिड वाढू शकतं. 

यामुळेच यूरीक ऍसिडची समस्या असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच योग्य तो आहार घ्यावा. 

टीप- हा लेख सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे. कुठलेही उपचार करण्यापूर्वी आपल्या डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.