Flesh Eating Bacteria: आता बॅक्टेरियाही खाऊ लागलेत अर्धकच्च मांस; हे बॅक्टेरिया किती असतात घातक?

Health Tips अर्धकच्चे मांस खाल्ल्यामुळे संसर्ग होऊ शकतो. एखाद्या जखमेवर मलमपट्टी न करता आपण तसेच स्विमिंग पूलमध्ये पाण्याच्या संपर्कात आल्याने संसर्ग होऊ शकतो.
harmful bacteria news
harmful bacteria newssakal
Updated on

Health News आता मांस खाणाऱ्या बॅक्टेरियाचा धोका वाढला आहे. एका देशात आतापर्यंत तीन जणांचा यामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना न्यूयार्क आणि आसपासच्या परिसरात घडली आहे.

स्थानिक वैद्यकीय अधिकारी क्रिस्टोफर बॉयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मांस खाणाऱ्या बॅक्टेरिया 'विब्रियो वल्मिफिकलसमुळे कनेक्टीकट'मुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. स्विमिंग पूलमध्ये पोहल्यामुळे बॅक्टिरेयाचा संसर्ग झाला. तिसऱ्या घटनेत, सीफूड खाल्ल्यानंतर संसर्ग झाला.

harmful bacteria news
Probiotic Diet : प्रोबायोटिक्स म्हणजे काय? ज्यामुळे अल्झायमर अन् डिमेंशियाचा प्रभाव होतो कमी

मृतकांचे वय 60 ते 80 वर्षे सांगण्यात आलंय. न्यूयार्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, हा बॅक्टेरिया न्यूयार्कमध्ये आढळला की अन्य शहरामुळे संसर्ग वाढला आहे ? याचा शोध सुरू करण्यात आला आहे. कसा असतो हा मांस खाणारा बॅक्टेरिया आणि त्याचा संसर्ग कसा होतो जाणून घेऊ.

harmful bacteria news
आहार‘मूल्य’ : श्रावण आणि आहार

कसा होतो संसर्ग ?

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीननुसार, लॅटीन भाषेत विब्रियोचा अर्थ बाईब्रेट म्हणजे घाव करणारा असा होतो. अर्धकच्चे मांस खाल्ल्यामुळे याचा संसर्ग होऊ शकतो. शरीरावरील एखाद्या उघड्या जखमेसोबत स्विमिंग पूलमध्ये उतरल्यास व पाण्याच्या संपर्कात आल्याने संसर्ग होऊ शकतो.

जर्नल ऑफ अमेरिकन असोसिएशननुसार, विब्रियो बॅक्टेरियाचा संसर्ग दूषित खाणे-पिणे आणि उघड्या जखमेच्या माध्यमातून होऊ शकतो. अशा घटना मे महिना ते ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान घडतात. कारण अशावेळी वातावरणात थोडी उष्णता असते.

harmful bacteria news
Tulsi Water Benefits : रोज सकाळी तुळशीचे पाणी प्यायल्याने शरीराला मिळतात 'हे' फायदे

बॅक्टेरिया किती धोकादायक?

या बॅक्टेरियाचा संसर्ग धोकादायक समजला जातो. संसर्ग झाल्यास ताबाडतोब उपचार करणे गरजेचं असते. हा बॅक्टेरिया शरीराच्या भागासाठी धोकादायक असतो. याच्या संसर्गामुळे पाचपैकी एक व्यक्तीचा मृत्यू होतो.

तज्ज्ञ म्हणतात, उघड्या जखमेमुळे संबंधित भागात संसर्ग पसरतो. त्यामुळे याला मांस खाणारा बॅक्टेरिया म्हणून ओळखले जाते. अमेरिकन हेल्थ एजन्सी सीडीसीनुसार, याचा संसर्ग झाल्यास डायरिया, उलटी होणे, ताप येणे, शरीर थरथर कापणे अशी लक्षणे दिसतात.

संसर्गाच्या 24 तासानंतर अशी लक्षणं दिसतात. संसर्ग झाल्यास शरीरावरील जखमेमुळे तीन दिवस त्रास होतो. कारण यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती कमी होते, असे म्हटले जात आहे.

रूग्णास संसर्ग झाला आहे की नाही? याचे निदान हे रक्त तपासणीतून स्पष्ट होते. जखमेच्या भागातील सॅम्पल घेऊन डॉक्टर याबाबतची माहिती देऊ शकतात. संसर्ग झाल्यास जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. तसेच रुग्णास अँटी-बायोटिक्स दिले जातात. अशी प्रकरणं वर्ष 2020, वर्ष 2021 आणि वर्ष 2022 मध्ये समोर आली आहे. तापमान वाढ झाल्यानंतर असे प्रकार समोर येत असल्याचेही बोलले जात आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()