झोपेत घोरण्याची आहे सवय? जाणून घ्या यामागील खरे कारण व गंभीर आजाराची लक्षणे

Snore Issues : तुम्हाला देखील झोपेत घोरण्याची सवय आहे का? तर मग वेळीच व्हा सावध. कारण याद्वारे तुमचे शरीर गंभीर आजारांचे संकेत देत आहे, याकडे दुर्लक्ष करू नका.
Snore Issues
Snore Issues Sakal
Updated on

प्रत्येकाच्या घरात एकतरी सदस्य असा असतोच, ज्याला झोपेत घोरण्याची सवय असते. या सवयीची जाणीव त्याला/तिला मुळीच नसते, पण इतरांना मात्र चांगलाच त्रास होतो. साधारणतः घोरणे म्हणजे गाढ झोप लागणे, असा अनेकांचा समज असतो. 

पण मित्रांनो थांबा, खरंतर हा तुमचा गैरसमज आहे. कारण घोरणे म्हणजे चांगली झोप न येणे आणि महत्त्वाचे म्हणजे हे एका गंभीर समस्येचे लक्षण आहे. घोरणे म्हणजे स्लीप अ‍ॅपनिया (Sleep Apnea) आजाराचे लक्षण असू शकते.  

Snore Issues
Yogurt and Curd Difference दही व योगर्टमध्ये नेमका काय आहे फरक? शरीरासाठी कोणता पर्याय आहे पोषक

हा एक स्लीप डिसऑर्डर आहे, ज्याचे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. नियमित घोरणे हे या आजाराच्या लक्षणांपैकी एक आहे आणि यावर ताबडतोब वैद्यकीय उपचार होणे देखील गरजेचं आहे.   

Snore Issues
Cucumber For Weight Loss काकडी अशा पद्धतीने खाल्ल्यास वाढलेले वजन झटपट होईल कमी

स्लीप अ‍ॅपनियाची समस्या कोणत्या गोष्टींमुळे निर्माण होते?

  • एखाद्या व्यक्तीच्या शरीराचे वजन जास्त असेल किंवा गळ्याचा भाग बाहेरील बाजूने वाढला असल्यास स्लीप अ‍ॅपनिया विकाराची समस्या निर्माण होऊ शकते. 

  • जंक फूड, मद्यपान, धूम्रपान इत्यादी खराब जीवनशैलीमुळे देखील ही समस्या निर्माण होऊ शकते.

  • टॉन्सिल्स वाढणे

Snore Issues
Nocturia Disease : सावधान! रात्री झोपण्यापूर्वी जास्त पाणी पित आहात का? तुम्ही या आजारास पडू शकता बळी

आहारामध्ये या पदार्थांचा करावा समावेश  

  • ज्या फळांमध्ये मेलोटनिन (Melatonin Sleep Apnea) भरपूर प्रमाणात असते, अशा फळांचा डाएटमध्ये समावेश करावा.

  • द्राक्षे, डाळिंब, काकडी यासारख्या फळांचे सेवन करा. यातील पोषणतत्त्वांमुळे रात्रीची चांगली झोप येण्यास मदत मिळते. 

  • चरबीयुक्त पदार्थांचा आहारात कमी प्रमाणात समावेश करावा.

  • तज्ज्ञांचा सल्ला घेऊन स्लीप अ‍ॅपनिया विकारावर वेळीच उपाय करा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.