Underweight Health Problems लठ्ठपणा ही आपल्या आरोग्यासाठी एक गंभीर समस्या आहे. जंक फूड, फास्ट फूड आणि वाईट जीवनशैलीमुळे तुमच्या शरीराचे वजन जलदगतीने वाढू शकते. यामुळे कित्येक गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता असते.
लठ्ठपणामुळे हृदयविकार, मधुमेह, फॅटी लिव्हर यासारख्या आजारांचा धोका वाढतो. या विकारांमुळे शरीरास होणारा त्रास नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधोपचारांची मदत घ्यावी लागते. दुसरीकडे लठ्ठपणाप्रमाणेच शरीराचे वजन अतिशय कमी (Underweight Side Effects) असणे देखील आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
शरीराचे वजन कमी असल्यास कोणकोणत्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया…
साधारणतः शरीराची उंची व वजनानुसार बॉडी मास इंडेक्स (BMI) मोजला जातो. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या (Center for Disease Control and Prevention) माहितीनुसार, एखाद्या निरोगी व्यक्तीचे बीएमआय 18.5 ते 24.9 दरम्यान असावे. यापेक्षा कमी असल्यास ही मंडळी कमी वजनाच्या श्रेणीत येतात. यामुळे आरोग्यास कित्येक नुकसान पोहोचू शकते.
1. कुपोषणाची समस्या
जर एखाद्या व्यक्तीचे वजन खूपच कमी असेल तर त्यांच्या शरीरामध्ये पोषणतत्त्वांची कमतरता निर्माण होते आणि हे लोक कुपोषणासारख्या आजारास बळी पडतात. यामुळे अशक्तपणा, थकवा, टक्कल पडणे, त्वचा कोरडी होणे आणि दातांच्या समस्या उद्भवू शकतात.
2. रोगप्रतिकारक शक्ती होते कमकुवत
कित्येक अभ्यासांमध्ये ही बाब आढळून आली आहे की, शरीराचे वजन कमी असल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. यामुळे वारंवार आजारांची लागण होते. कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीमुळे अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात.
3. शरीराचे हाडे होतात कमकुवत
शरीरामध्ये पोषणतत्त्वांची कमतरता निर्माण होते, त्यावेळेस व्हिटॅमिन डी आणि कॅल्शिअम या घटकांचीही कमतरता होऊ शकते. अशा स्थितीत ऑस्टिओपोरोसिस आजाराची समस्याही उद्भवू शकते. या आजारात शरीराचे हाडे कमकुवत होतात, ज्यामुळे दुखापत किंवा फ्रॅक्चर होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.
4. वंध्यत्वाची समस्या
शरीराचे वजन आवश्यकतेपेक्षा कमी असल्यास त्या व्यक्तीच्या शरीरातील हार्मोन्स असंतुलित होऊ शकतात. यामुळे वंध्यत्वाची समस्या उद्भवू शकते.
5. शरीराची उंची वाढत नाही
पोषणतत्त्वांच्या अभाव व कमी वजनामुळे मुलांच्या शरीराची उंची वाढत नाही. ही समस्या टाळण्यासाठी व शरीराचे वजन वाढावे यासाठी फळे, भाज्या, दूध, अंडी अशा पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करावा.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.