Morning Walk सकाळी हिरव्या गवतावर अनवाणी चालण्याचे फायदे समजल्यास नियमित कराल हा व्यायाम

जर आपण नियमित गवतावर अनवाणी चालाल तर आरोग्यास कित्येक फायदे मिळतील. जाणून घेऊया सविस्तर माहिती…
benefits of walking barefoot on grass
benefits of walking barefoot on grass sakal
Updated on

हल्लीच्या धकाधकीच्या लाइफस्टाइलमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने लोक कित्येक आजारांना बळी पडत आहेत. या आजारांपासून बचाव करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचारही केले जातात. कित्येक जण तर दिवसभरातून औषधाच्या सात-आठ गोळ्या खातात आणि तेही सकाळी-संध्याकाळी अशा दोन वेळेस, बापरे!

यामुळे तुमच्या आरोग्याचे तात्पुरते संरक्षण होण्यास नक्कीच मदत मिळते. पण याचे शरीरावर दुष्परिणामही पाहायला मिळतात. गंभीर आजारांपासून स्वतःला दूर ठेवायचे असेल तर नियमित व्यायाम व पौष्टिक आहाराचे सेवन करणं गरजेचं आहे. 

व्यायाम करणं शक्य नसल्यास सकाळी-सकाळी गवतावर अनवाणी चालणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. जाणून घेऊया यामुळे आरोग्यास कोणकोणते लाभ मिळू शकतात, याबद्दल सविस्तर माहिती…

benefits of walking barefoot on grass
Health Tips : अनेक आजारांवर गुणकारी आहे किचनमधील हा मसाला, जाणून घ्या कोणते आजार होतील दूर

ताण व चिंतेची समस्या होते दूर 

सकाळी-सकाळी गवतावर अनवाणी चालल्यास मेंदू शांत व स्थिर होण्यास मदत मिळते. तसेच शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचाही पुरवठा होतो. ज्यामुळे संपूर्ण शरीर तणावमुक्त होते.

benefits of walking barefoot on grass
Health Tips : Slim फिगर आणि Glowing त्वचेसाठी मोसंबी खाणं फायदेशीर, जाणून घ्या मोसंबीचे फायदे

शरीरातील रक्तप्रवाह वाढतो

ताणतणावामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते. ही समस्या नियंत्रणात आणण्यासाठी नियमित गवतावर अनवाणी चालावे. यामुळे मूड देखील फ्रेश राहतो. 

benefits of walking barefoot on grass
Health Tips : झटपट Weight Loss करायचाय? मग मखानाच्या या हेल्दी आणि टेस्टी रेसिपी नक्की ट्राय करा

पेशींवरील सूज कमी होते

फ्री रॅडिकल्समुळे शरीरातील पेशींमध्ये सूज निर्माण होते. हिरव्या गवतावर अनवाणी चालल्यास शरीराचे सर्व अवयव सक्रिय होतात आणि पेशींवरील सूज कमी होऊ लागते. कोवळ्या उन्हात चालल्याने शरीराला नैसर्गिक स्वरुपात व्हिटॅमिन डीचा देखील पुरवठा होतो.  

मानसिक शांतता लाभते

चालण्याचा व्यायाम केल्याने मनाला खूप शांतता मिळते. आपण नियमित हिरव्या गवतावर अनवाणी चालल्यास मन व मेंदू दोन्ही शांत राहण्यास मदत मिळते.

डोळ्यांसाठी लाभदायक

हिरव्या गवतावर अनवाणी चालणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक असते. यामुळे दृष्टी चांगली राहण्यास मदत मिळते, असे म्हणतात. डोळ्यांवरील ताण देखील कमी होतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.