एकाच ठिकाणी खूप वेळ उभे राहताय? या समस्यांचा करावा लागेल सामना

एकाच ठिकाणी खूप वेळ उभे राहिल्यास किंवा उभे राहून काम केल्यास आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
prolonged standing at work
prolonged standing at work Sakal
Updated on

बऱ्याचदा काही लोकांना कामानिमित्त जास्त वेळ उभे राहावे लागते. अधेमधे उभे राहून काम करावे लागत असेल, तर आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्या निर्माण होत नाहीत. पण नियमित एखाद्या व्यक्तीला तास-न्-तास उभे राहून काम करावे लागले तर आरोग्यावर वाईट दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. 

हो तुम्ही वाचलंय ते अगदी बरोबर आहे. या समस्यांकडे वेळीस लक्ष न दिल्यास दीर्घकाळासाठी गंभीर समस्यांचा सामना करावा लागेल. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.

prolonged standing at work
कोमट पाण्यात तूप मिक्स करून प्या, आरोग्यास मिळतील जबरदस्त फायदे

पाय सुजणे

नियमित आपण एकाच ठिकाणी खूप वेळ उभे राहून काम करत असाल तर पायांना सूज येऊ शकते. तास-न्-तास उभे राहिल्यानं शरीराच्या खालील भागात रक्त जमा होऊ शकते. यामुळे हळूहळू पायांवरील सूज वाढू शकते व पायांचे दुखणेही वाढते.

prolonged standing at work
मुलांच्या नाभीवर चंदनाची पेस्ट लावण्याचे मोठे फायदे

स्नायूदुखी

एकाच ठिकाणी बराच वेळ उभे राहिल्यास पायांचे दुखणे वाढू शकते. यामुळे पायांच्या स्नायूंवरही दुष्परिणाम होतात. परिणामी कालांतराने उभे राहणंच कठीण होऊ शकते.

prolonged standing at work
सकाळी रिकाम्या पोटी चावून खा ही औषधी पाने, मिळतील फायदे

कंबरदुखी 

पायांसह कंबर आणि पाठदुखीही वाढू शकते. विशेषतः कमरेखालील भागाचे दुखणे अधिक वाढते. यामुळे शरीराचे पोश्चर देखील बिघडते.

रक्ताभिसरण प्रक्रियेवर होतील परिणाम

एकाच ठिकाणी उभे राहिल्याने पायांवर वजन येते. परिणामी पायांच्या नसांवरील ताण वाढतो. यामुळे रक्ताभिसरणाच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.