तन्मयने अत्तराची कुपी उघडताच शेजारी बसलेल्या गंधालीला लागोपाठ सात ते आठ शिंका आल्या. शिंका येणे थांबताच तिनं तन्मयला सर्वप्रथम त्याला आता माझ्या शेजारी बसू नकोस, असे ठणकावून सांगितलं. आसपास बसलेल्या मित्रमैत्रिणींना काही कळेना गंधाली इतकी का चिडतेय.
तन्मय उठून जेव्हा दुसरीकडे बसायला गेला, तेव्हा कळलं की गंधालीला अत्तराच्या सुगंधाने डोकेदुखी, शिंका येणे यासारखा त्रास होतो. काही लोकांना तर धूप, अगरबत्ती इत्यादी गंधामुळेही चक्कर येऊ लागते. आपणही यांपैकीच एक आहात का? तर तुम्हाला देखील अत्तर, सेंट, अगरबत्तीच्या गंधाची अॅलर्जी आहे, हे लक्षात घ्या मंडळींनो.
काही लोकांना तीव्र स्वरूपातील सुगंधामुळे हा त्रास होतो, तर काही लोकांना सुगंध अगदी सौम्य जरी असला तरीही त्यांचे डोके दुखू लागते. परिणामी या लोकांच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागते, डोळे लाल होणे यासारख्याही समस्या उद्भवतात. अशा लोकांना सार्वजनिक ठिकाणीही मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती
सेंट किंवा परफ्युममध्ये कृत्रिमरित्या तयार केलेल्या सुगंधाचा समावेश केला जातो. यामुळेच लोकांना सेंटच्या सुगंधाची अॅलर्जी होऊ शकते. डिओ, सेंट, परफ्युम, अगरबत्ती इत्यादी गोष्टी तयार करण्यासाठी अॅल्कोहल, हायड्रोकार्बनसह अन्य रसायनांचाही वापर केला जातो. ज्यामुळे अॅलर्जीची समस्या निर्माण होते.
त्वचेशी संबंधित समस्या
डोळे लाल होणे
डोळ्यांतून पाणी येणे
डोके दुखी
गरगरल्यासारखे वाटणे
चक्कर येणे
गुदमरल्यासारखे वाटणे
अस्वस्थता वाढणे
शिंका येणे
सेंट, अत्तर किंवा परफ्युमच्या सुगंधामुळे अॅलर्जी होत असल्यास आपण शक्यतो या गोष्टींचा वापरच करणं टाळावे.
सार्वजनिक ठिकाणी याचा सामना करावा लागत असल्यास एअर प्युरिफायर स्वतःसोबत नक्की ठेवा.
नैसर्गिक सामग्रींपासून तयार केलेल्या सेंट, अत्तराचा वापर करावा.
सेंटच्या सुगंधामुळे जास्त त्रास होत असल्याचा त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
डॉक्टरांकडूनच खबरदारीचे उपाय जाणून घ्या आणि त्यांचे पालन करा.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.