Health Tips : महिलांना होणाऱ्या खांदे दुखीची ही आहेत कारणे? जाणून घ्या उपाय  

खांदे दुखू नयेत असं वाटतं असेल तर आत्ताच हे बदल करा
Health Tips
Health Tipsesakal
Updated on

Health Tips: महिलांना इतरांची काळजी घेण्यासाठी वेळ असतो. पण स्वत:ची काळजी घ्यायची वेळ येते तेव्हा त्या दुर्लक्ष करतात. घरातील प्रमुख महिला अनेकदा काम, कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे आरोग्याकडे फारसं लक्ष देत नाहीत. ज्यामुळे त्यांना आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात.

महिला सतत तक्रार करत असतात की त्यांचे खांदे दुखत आहेत. सतत तिचे हात इतरांसाठी काहीतरी करण्यात व्यस्त असतात. त्या हातांना थोडाही आराम नसतो, त्यामुळेच हे दुखणे सतत डोकं वर काढत असते.  

अलिकडच्या काळात  महिलांमध्ये खांद्याच्या आरोग्याच्या समस्या खूप सामान्य झाल्या आहेत. पण, या खांदेदुखीची कारणे काय आहेत हे तुम्हाला माहितीय का? त्यावर उपाय काय आहेत याचा तुम्ही कधी विचार केलाय का? (Women Health)

Health Tips
Women Health : आई सतत आजारी पडतेय तर तिला आहे 'या' Vitamins ची जास्त गरज!

महिलांना खांदा दुखी होण्याची 'ही' कारणे

व्यायाम

आजकाल वेळेअभावी लोकांना व्यायामासाठी वेळ देता येत नाही. केवळ काम करायचे, खांदे, हात, पाय यांची हालचाल योग्य होऊ द्यायची नाही, त्यामुळेच खांद्याचं दुखणं बळावतं.  घरी किंवा ऑफीसमध्ये अनेक तास काम करणं. डेस्कवर असाल तर हालचाल न करणं, यामुळे खांदे दुखायला लागतात.

बसण्याची योग्य स्थिती

अनेक महिलांना होणारी खांदेदुखी ही त्यांच्या बसण्याच्या चुकीमुळे होऊ शकते. चुकीच्या स्टेपमध्ये बसल्याने खांद्यावर ताण येतो आमि त्यांमध्ये वेदना सुरू होतात. वेदना कमी करण्यासाठी  चांगले एर्गोनॉमिक्स आणि कामाच्या ठिकाणी थोडे क्रियाकलाप महत्वाचे आहेत. खांद्याच्या खराब आरोग्यामुळे गोलाकार खांदे, पुढे झुकलेले शरीर आणि मान दुखू शकते.

कामाचा वाढता ताण

आजकाल कामाच्या वाढत्या ताणामूळे यामुळे सर्वांनाच अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषत: महिलांना ऑफिस आणि घर या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. ज्यामुळे त्यांच्या तणावाची पातळी वाढू शकते. खांदे आणि मान दुखणे हे बऱ्याचदा तणावाच्या शारीरिक लक्षणांपैकी एक असते.

अशा तऱ्हेने तणावामुळे होणाऱ्या खांद्याच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही आवश्यक बदल करू शकता. (Shoulder Pain)

Health Tips
Womens Health : तुमची झोप उडण्याचं कारण Hormonal changes ही असू शकतं?

खांद्यांचा जास्त वापर

टायपिंग, पेंटिंग किंवा खेळ यासारख्या ऍक्टिव्हीटीमध्ये वारंवार खांद्याचा वापर केला जातो. ज्यामुळे स्नायूंच्या दबावामुळे वेदना आणि सूज येऊ शकते. हे टाळण्यासाठी नियमित विश्रांती, स्ट्रेचिंग आणि काम करण्याच्या योग्य तंत्राच्या मदतीने खांदेदुखी कमी करता येते.

हार्मोन्समध्ये होणारे बदल

खांदा दुखणे देखील स्त्रियांनी अनुभवलेल्या हार्मोनल बदलांमुळे होऊ शकते. विशेषत: गरोदरपणात आणि रजोनिवृत्तीदरम्यान. हार्मोन्समधील बदलांमुळे सांध्याच्या लवचिकतेवर परिणाम होतो. ज्यामुळे वेदना आणि नुकसान होण्याचा धोका वाढतो.

अशा वेळी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून, वारंवार व्यायाम करून आणि योग्य वैद्यकीय सल्ल्याच्या मदतीने खांदेदुखीवर नियंत्रण मिळवता येते.

वयाशी संबंधित घटक

वयाशी संबंधित घटकांमुळे महिलांना खांदेदुखीची समस्या उद्भवू शकते. अशावेळी नियमित व्यायाम, निरोगी वजन आणि थोडी शारिरीक हालचाल यांच्या मदतीने या समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.

Health Tips
Women Health : महिलांमध्ये वाढतेय फायब्रॉइड्सची समस्या

खांदे दुखू नयेत असं वाटतं असेल तर आत्ताच हे बदल करा

खांद्यांवर जास्त ताण येऊ देऊ नका

खांदे दुखायला लागल्यास योग्य उपचार घ्या

खांद्यांची मालिश करा

झोपण्याची आणि बसण्याची स्थिती योग्य आहे का पहा

रात्री झोपल्यावर खांद्यांखाली एक जाड रूमाल गुंडाळून ठेवा, त्यानेही आराम मिळेल

खांदे दुखी कमी होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.