Health: पाणी पिऊनही उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो

हाय ब्लडप्रेशर नियंत्रित ठेवण्याचे अनेक मार्ग आहेत; त्यापैकी सर्वात महत्त्वाचा आणि निरोगी मार्ग म्हणजे नियमित जीवनशैली.
drinking water
drinking water sakal
Updated on

रक्तदाबाचा म्हणजेच ब्लड प्रेशरचा त्रास कोणत्याही वयात होऊ शकते पण वाढत्या वयासोबत याने हृदय विकार म्हणजेच हार्ट अटॅक सारख्या मोठ्या आजारांना आमंत्रण देऊ शकतो. हाय ब्लडप्रेशर नियंत्रित ठेवण्याचे अनेक मार्ग आहेत; त्यापैकी सर्वात महत्त्वाचा आणि निरोगी मार्ग म्हणजे नियमित जीवनशैली. डॉक्टरांच्या मताप्रमाणे दर तिसरा व्यक्ती हाय ब्लड प्रेशरच्या समस्येने त्रस्त आहे. हाय ब्लड प्रेशर वर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधांसोबत रोजच्या जेवणाचीही काळजी घ्यावी लागते.

नियमित व्यायाम केल्याने हृदय निरोगी राहते आणि स्ट्रेस कमी होतो.  आरोग्यदायी जेवणासोबत पाणी पिऊन आणि हायड्रेटेड राहूनही उच्च रक्तदाब कमी करता येतो.  पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत राहते, त्यामुळे हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता कमी होते.  

drinking water
Recipe: विदर्भ स्पेशल भरली वांगी मसाला कशी तयार करायची?

किती पाणी पिणे गरजेचं आहे?

एकंदरीत चांगल्या आरोग्यासाठी हायड्रेटेड राहणे खूप महत्वाचे आहे. व्हेरीवेल हेल्थच्या मते, डिहायड्रेशन आणि ब्लड प्रेशर यांचा संबंध आहे. जेव्हा शरीर योग्यरित्या हायड्रेटेड असते तेव्हा हृदय प्रभावीपणे पंप करण्यास सक्षम असते.  त्यामुळे रक्ताभिसरण बरोबर राहते.  डिहायड्रेशनच्या बाबतीत, हृदयाला पंप करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, ज्यामुळे रक्ताचे प्रमाण कमी होऊ लागते. जेव्हा रक्ताचे प्रमाण कमी होते तेव्हा ब्लड प्रेशर आणि हार्ट रेट दोन्ही वाढतात.

drinking water
Diwali Recipe: दिवाळी स्पेशल पारंपरिक पद्धतीने चंपाकळी कशी तयार करायची?

पाणी आणि हेल्थी हार्ट

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारण्यासाठी पुरेसे पाणी पिणे महत्वाचे आहे. एका अभ्यासानुसार, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मिसळलेले पाणी प्यायल्याने उच्च रक्तदाब कमी व्हायला मदत होते.  या पोषक तत्वांचे पाण्याद्वारे सेवन केल्याने शरीर त्यांना सहज शोषून घेते.  व्हिटॅमिन्स आणि मॅग्नेशियमसाठी पुदिना, काकडी, लिंबू आणि जांभूळ पाण्यात टाकता येते.

drinking water
Health Tips : पुरुषांनाही होतो ब्रेस्ट कँन्सर, जाणून घ्या लक्षणं

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी पाण्याचे प्रमाण-

महिलांसाठी - महिलांनी दररोज सुमारे 11 पेले किंवा 2.7 लिटर पाणी प्यावे.  

पुरुषांसाठी- पुरुषांनी दररोज 15 पेले म्हणजेच 3.7 लिटर पाणी प्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.