Yoga For Migraine : तुम्हालाही मायग्रेनचा त्रास होत असेल तर 'हे' 5 योगासने करा; लवकरच फरक जाणवेल

मायग्रेनमध्ये, डोक्याच्या एका बाजूला किंवा संपूर्ण डोक्यात तीव्र वेदना असते जी मायग्रेनच्या स्वरूपात येते. या समस्येचा सामना करण्यासाठी योगासने तुम्हाला खूप मदत करू शकतात.
Migraine
Migraine sakal
Updated on

सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे अपुरी झोप आणि वाढता तणाव यामुळे डोकेदुखी आणि मायग्रेन यांसारख्या समस्या उद्भवू लागतात. मायग्रेनची अनेक कारणे असू शकतात जसे की तणाव, हार्मोनल बदल, अन्न, हवामानातील बदल इ. मायग्रेनसाठी औषधे उपलब्ध आहेत. पण त्यांचे साईड इफेक्ट्स देखील होऊ शकतात.

मायग्रेनमध्ये, डोक्याच्या एका बाजूला किंवा संपूर्ण डोक्यात तीव्र वेदना असते जी मायग्रेनच्या स्वरूपात येते.  या समस्येचा सामना करण्यासाठी योगासने तुम्हाला खूप मदत करू शकतात.

मायग्रेनसाठी कोणते योगासन करावे? जाणून घ्या

पश्चिमोत्तनासन

मायग्रेनच्या वेदना कमी करण्यासाठी पश्चिमोत्तनासन हे अतिशय प्रभावी आसन आहे. या आसनामुळे मन शांत होते आणि तणावापासून आराम मिळतो. तणाव हे मायग्रेनच्या वेदनांचे सर्वात मोठे कारण आहे.

सेतुबंधासन

सेतुबंध आसनामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो, ज्यामुळे मन शांत राहते. याशिवाय, चिंता आणि तणाव दूर करण्यासाठी देखील हे फायदेशीर आहे. या आसनाचा सराव केल्याने मेंदूपर्यंत योग्य प्रमाणात रक्त आणि ऑक्सिजन पोहोचतो, ज्यामुळे मायग्रेनचा त्रास कमी होतो.

Migraine
Monsoon Health Care : पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी रोज सकाळी प्या 'हा' काढा..., जाणून घ्या याचे अनेक फायदे

अधो मुख स्वानासन

या आसनामुळे मेंदूतील रक्ताभिसरण वाढते आणि मायग्रेनच्या दुखण्यापासून आराम मिळतो. तसे, या आसनाच्या सरावाने यकृत आणि किडनी देखील निरोगी ठेवता येते आणि पचनसंस्था देखील मजबूत होते.

मार्जरियासन

मार्जारासनाचा सराव केल्याने मन आणि स्नायूंना आराम मिळतो. यामुळे तुमची श्वास घेण्याची क्षमता देखील सुधारते आणि तणाव कमी होतो.

बालासना

याचा दररोज सराव केल्यास तणाव आणि नैराश्याची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते. यामुळे मायग्रेनचा त्रास नाहीसा होतो.

Pratima olkha:

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com