Healthy Diet For Kids : मुलांच्या निरोगी वाढीसाठी आहारात ‘या’ खाद्यपदार्थांचा करा समावेश, मिळतील भरपूर फायदे

Healthy Diet For Kids : मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी संतुलित आहार आणि व्यायाम अतिशय महत्वाचा आहे.
Healthy Diet For Kids
Healthy Diet For Kidsesakal
Updated on

Healthy Diet For Kids : मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी संतुलित आहार आणि व्यायाम अतिशय महत्वाचा आहे. आपल्या मुलांना या दोन्ही गोष्टी व्यवस्थित मिळाव्यात, यासाठी पालक सर्वोतोपरी प्रयत्न करताना दिसतात.

लहान मुलांची सुरूवातीची वर्षे ही वाढीसाठी महत्वाची असतात. मुलांना आहारातून मिळणारे योग्य पोषण हे मेंदूच्या विकासाला चालना देण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडतात. त्यासाठी मुलांच्या आहारात योग्य अन्नपदार्थांचा समावेश करा. यामुळे, मुलांच्या वाढीला मदत होते. (Healthy Diet For Kids)

ओमेगा फॅटी अ‍ॅसिड, व्हिटॅमिन बी, लोह, प्रथिने, आयोडीन आणि कोलीन हे मेंदूच्या वाढीसाठी आवश्यक पोषक घटक आहेत. त्यामुळे, या सर्व घटकांनीयुक्त असलेल्या खाद्यपदार्थांचा मुलांच्या आहारात जरूर समावेश करा. आज आपण मुलांच्या योग्य वाढीसाठी फायदेशीर असणारे खाद्यपदार्थ कोणते? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

Healthy Diet For Kids
Parenting Tips : उन्हाळ्यात मुलांना स्विमिंग शिकवण्याचा विचार करताय? मग 'या' गोष्टींची घ्या खास काळजी

फळे खा

फळांचा मुलांच्या आहारात समावेश केल्यावर शरीर निरोगी राहण्यास मदत होते. फळांमध्ये असलेले पोषकघटक मुलांच्या वाढीसाठी मदत करतात. ब्लूबेरी, स्टॉबेरी आणि रास्पबेरीसारख्या फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्सचे भरपूर प्रमाण आढळते. हे घटक मेंदूचा ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळीपासून बचाव करतात. या लहान फळांमध्ये भरपूर जीवनसत्वे आणि पोषक घटक असतात. खास करून व्हिटॅमिनी सी जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. (Fruits)

हिरव्या पालेभाज्या

मुलांच्या सर्वांगीण विकासामध्ये हिरव्या पालेभाज्या महत्वाची भूमिका पार पाडतात. त्यामुळे, मुलांच्या आहारात या हिरव्या पालेभाज्यांचा जरूर समावेश करा. पालक, ब्रोकोली, मेथी, चाकवतसारख्या पालेभाज्या मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेली जीवनसत्वे आणि खनिजांचा पुरवठा करतात.

या व्यतिरिक्त या पालेभाज्यांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन के मेंदूच्या पेशींच्या वाढीसाठी महत्वाची असतात. त्यामुळे, मुलांच्या योग्य वाढीसाठी त्यांच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा अवश्य समावेश करा. (Green Vegetables)

अंडी खा

अंड्यांमध्ये प्रथिने आणि कर्बोदकांचे विपुल प्रमाण आढळते. अंड्यांना प्रथिनांचे पॉवरहाऊस देखील म्हटले जाते. जे मेंदूच्या वाढीसाठी आवश्यक पोषकतत्वे पुरवण्याचे काम करतात. अंड्यामध्ये प्रोटिन असते जे शरीरातील न्यूरोट्रांन्समीटर नियंत्रित करण्यास मदत करतात. त्यामुळे, मुलांच्या आहारात अंड्यांचा समावेश जरूर करा. यामुळे, मुलांच्या वाढीस मदत होऊ शकते. (Eggs)

Healthy Diet For Kids
Parenting Tips: मोबाईलचा अतिवापर मुलांच्या वाढीत ठरू शकतो अडथळा, अशी घ्या काळजी

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.