Healthy Diet: असे टाळा ‘फूड क्रेव्हिंग’

निरोगी दिनचर्या पाळायचा किंवा पौष्टिक आहार घेण्याचा विचार केल्यावर ‘फूड क्रेव्हिंग’ हा सर्वांत सामान्यपणे वापरला जाणारा शब्द आहे.
Food Craving
Food CravingSakal
Updated on

निरोगी दिनचर्या पाळायचा किंवा पौष्टिक आहार घेण्याचा विचार केल्यावर ‘फूड क्रेव्हिंग’ हा सर्वांत सामान्यपणे वापरला जाणारा शब्द आहे. तुम्हाला विशिष्ट प्रकारचा पदार्थ खाण्याची इच्छा होण्याचे मुख्य कारण म्हणजे तुमच्या शरीरात पोषक तत्त्वांची कमतरता असते. उदाहरणार्थ, तुमच्या दोन जेवणांमध्ये बराच वेळ असतो, तुम्ही तीन तासांपेक्षा जास्त काळ उपाशी असता किंवा तुम्ही कमी कार्बयुक्त आहार घेत असता, तेव्हा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी लक्षणीयरीत्या कमी होते आणि तुम्हाला जास्त साखरयुक्त पदार्थ खाण्याची इच्छा होते. ह्यामध्ये पेस्ट्री, मिठाई, बेकरी उत्पादने, ब्रेड आणि इतर काही पदार्थांचा समावेश असू शकतो.

फूड क्रेव्हिंगवरील उपाय

  • जेव्हा तुम्हाला काहीतरी खाण्याची इच्छा झाल्यावर तुम्हाला कोणत्या प्रकारचे अन्न हवे आहे याकडे बारकाईने लक्ष द्या. दिवसाच्या विशिष्ट वेळी तुम्हाला विशिष्ट पदार्थ हवा आहे का ते देखील तपासून बघा.

  • त्या पदार्थाऐवजी आरोग्यदायी पर्याय निवडा. तुम्ही तुमची गोड पदार्थ खाण्याची इच्छा एखादा हेल्दी एनर्जी बार, नैसर्गिकरित्या गोड पदार्थ जसे की शेंगदाणा किंवा बदाम ट्रफल्सने पूर्ण करू शकता. मांसाहार करण्याची इच्छा ताजे आणि घरगुती मासे खाऊन पूर्ण केली जाऊ शकते.

  • तुम्ही तुमच्या जेवण किंवा स्नॅक्समध्ये गरजेपेक्षा जास्त जास्त अंतर ठेवत नाही ना याची खात्री करा. हिरवे रस आणि स्मूदी सारख्या पौष्टिक आहार अधून मधून घेत रहा (हे दर 3-4 तासांनी घ्या).

  • शरीरातील पाणी कमी झाल्यावर तुम्हाला भूक लागल्यासारखे वाटते किंवा काही विशिष्ट पदार्थ खाण्याची इच्छा होते. म्हणून, आपल्या पाण्याच्या सेवनाकडे लक्ष द्या.

अँटी-क्रेव्हिंग सुपरफूड्स

सुकामेवा आणि बिया ः हे अत्यंत पौष्टिक असतात आणि नेहमीच आरोग्यदायी असतात. सर्व प्रकारचा सुकामेवा आणि बिया तुम्हाला तुमच्या रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतात आणि सतत काहीतरी खाण्याच्या इच्छेपासून दूर ठेवतात.

बटर कॉफी : बटर कॉफी अशा लोकांसाठी उत्तम काम करते ज्यांना कामाच्या गडबडीतून वेळ मिळत नाही आणि ज्यांना सुकामेवा खायला देखील वेळ नाही. एक कप बटर कॉफी घ्या, त्याच ब्लॅक कॉफीमध्ये १ चमचा तूप किंवा खोबरेल तेल मिसळा. हे तुमच्या इन्शुलिनची पातळी पूर्णपणे स्थिर करते, रक्तातील साखरेची पातळी वाढण्यापासून रोखते, जे फूड क्रेव्हिंगचे मूळ कारण आहे.

चॉकलेटसह ओटमिल ः ओटमिलमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते, ह्याच कारणामुळे ते अधिक वेळ पोट भरलेले राहण्यास, उत्कृष्ट ऊर्जा देण्यात आणि फूड क्रेव्हिंग दूर ठेवण्यात मदत करते. तुम्हाला ह्यात गोड हवे असल्यास १ चमचा किंवा १-२ क्यूब्स चॉकलेट घालून ओटमिल बनवू शकता.

सब्जा ः हे ओमेगा-३ फॅटी ॲसिडस् आणि फायबरसह अनेक महत्त्वपूर्ण पोषक तत्त्वांचा उत्तम स्रोत आहेत. ते फूड क्रेव्हिंग कमी करण्यास मदत करतात आणि त्यामुळे गरजेपेक्षा जास्त खाणे टाळण्यास मदत होते. तुम्ही ते १ लिटर पाण्यात घालून दिवसभर पिऊ शकता किंवा फ्रूट बाउल, सॅलड बाउल इत्यादीमध्ये वरून घालून घेऊन (टॉपिंग म्हणून) खाऊ शकता.

- डॉ. रोहिणी पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()