Healthy Drinks For Bones : आपल्याला काहीतरी हेल्दी खाल्ल पाहिजे, ज्यामुळे आपली शरीरसंपदा चांगली राहील. याची जाणिव उतरत्या वयातील लोकांना जास्त होते. कारण, तरूणपणी केलेल्या अनेक चूका त्यांना म्हातारपणी आठवत असतात. म्हातारपणात वेळ निघून गेल्यावर व्यायाम केला असता तर, जंक फूड खाल्लं नसतं तर हे आजार मागे लागले नसते असेच वाटते.
बदलती जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे सांधेदुखीची समस्या सामान्य होत आहे. चुकीच्या आसनात बसल्यामुळे अनेक वेळा कंबरदुखी, पाठदुखी आदी समस्यांना सामोरे जावे लागते. वृद्धत्वामुळे हाडांशी संबंधित समस्या देखील उद्भवतात.
हातातून वेळ निघून गेली म्हणून पश्चाताप करत बसू नका. हाडे मजबूत व्हावीत म्हणून काही फळांचे सेवन करणे फायद्याचं ठरते. तसं तर लहान बाळाला कोवळ्या उन्हात बसवतात ते व्हिटामिन डी मिळावे म्हणूनच. कारण व्हिटामिन डी आपली हाडे मजबूत करते.
अननसाचा रस
अननसाचा रस प्यायल्याने हाडे निरोगी राहतात. चवीला गोड आंबट असलेलं हे फळ आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. अननसाच्या रसामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे पुरेशा प्रमाणात आढळतात, जे अपचन आणि संधिवात यांसारख्या आजारांवर उपचार करण्यास मदत करतात.
संत्र्याचा रस
संत्र्यामध्ये भरपूर पोषक असतात, जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्याची चवही गोड आणि आंबट असते, जी सर्वांनाच आवडते. शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच हाडांसाठीही फायदेशीर आहे. संत्र्याचा रस रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा म्हणून ओळखला जातो, जो तुम्हाला अनेक आजारांपासून वाचवण्यास मदत करतो. (Bone Health)
स्ट्रॉबेरी रस
अँटी-ऑक्सिडंट्सने युक्त स्ट्रॉबेरीचा रस अनेक आजारांपासून तुमचे रक्षण करतो. त्यात व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, मॅंगनीज, कॉपर, झिंक असे अनेक पोषक घटक आढळतात. हा रस प्यायल्याने हाडांना ताकद मिळते.
हिरवा रस
हाडे निरोगी ठेवण्यासाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के खूप महत्वाचे आहे. शरीरात या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे हाडांशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या रसाचा समावेश करू शकता.
दूध
पोषक तत्वांनी युक्त दूध शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. हे कॅल्शियमचे समृद्ध स्त्रोत आहे, जे हाडे निरोगी ठेवण्यास मदत करते. रोज झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध प्यायल्यास अनेक समस्या टाळता येतात.
व्हिटामिन डी
तुम्ही लहान असा वा मोठे जर तुम्हाला अंगदूखी, गुढगेदुखी होत असेल. एखाद्या गंभिर अपघातामुळे अवयव दुखत असतील तर सकाळच्या कोवळ्या उन्हात चालणे किंवा फक्त बसून राहणे हा सोप्पा उपाय तुम्ही करू शकता. ज्यामुळे तुम्हाला पुरेशा प्रमाणात व्हिटामिन डी मिळते आणि तुम्हाला सांधेदुखीपासून आराम मिळू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.