Monsoon Healthy Drinks: रिमझिम पाऊस आनंद देतो. तसेच पावसाळ्यात अनेक आजार उद्भवतात.पावसाळ्यात डास चावल्याने अनेक आजारांचा धोका वाढतो तर बदलत्या वातावरणामुळे पचनसंस्था बिघडू शकते. पावळ्यात पचनसंस्थेचे कार्य मंदावते. यामुळे खास काळजी घेणे गरजेचे असते. तज्ज्ञांच्या मते पावसाळ्यात स्वच्छता तसेच योग्य आहार घेतल्यास कोणतेही आजार उद्भवणार नाही. पावसाळ्यात पोटाला निरोगी ठेवण्यासाठी पुढील पेयांचे सेवन करावे .
पावसाळ्यात पोटासंबंधित समस्या दूर ठेवायचे असेल तर स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे. कोणताही पदार्थ खाण्यापुर्वी हात स्वच्छ धुवावे. यामुळे कोणताही संसर्ग होणार नाही. तसेच फळे आणि भाज्या वापरण्यापुर्वी कोमट पाण्याने स्वच्छ धुवावे. तसेच पावसाळ्यात कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
अनेक लोक दिवसाची सुरूवात चहा किंवा कॉफीने करतात. पण याचे अतिसेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते. पण हर्बल टी पिणे आरोग्यासाठी एक चांगला पर्याय आहे. यासाठी आल्याचा चहा प्यावा. यामुळे पचन सुरळित होते. तसेच लिंबू पाणी प्यावे. लिंबामध्ये असलेले पोषक घचक पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करतात.
पावसाळ्यात पोटासंबंधित समस्या दूर ठेवण्यासाठी जिऱ्याचे पाणी पिऊ शकता. यासाठी जिरं बारिक करावे आणि गरम पाण्यात उकळावे. नंतर गाळून त्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे पचनसंस्था सुरळित कार्य करते.
हळदीचा वापर सर्वजण करतात. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अनेक लोक हळदीचे दूध पितात. हळदीमध्ये असलेले पोषक घटक आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते. हळद अतिसार, आतड्यांचे आरोग्य, पोटदुखी कमी करण्यास मदत करते. तसेच पुदीन्याचा रस पाण्यात मिक्स करून प्यायल्याने पचनासंबंधित समस्या कमी होते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.