Health Tips: कायम तरुण दिसायचंय? त्यासाठी कधी कुठल्या गोष्टी खाव्यात ते जाणून घ्या

तुम्हाला तुमचं तारुण्य दीर्घकाळ टिकवायचं असेल तर तुम्ही आहारातील या काही गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे
Health Tips
Health Tipsesakal
Updated on

Health care: संतुलित आहार हा उत्तम आरोग्यासाठी महत्वाचा असतो. मात्र आपण कुठल्या गोष्टी कधी खातो त्याची वेळसुद्धा महत्वाची ठरते. तुम्हाला तुमचं तारुण्य दीर्घकाळ टिकवायचं असेल तर तुम्ही आहारातील या काही गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे.

टेक्सस युनिवर्ससिटीच्या एक्सपर्टच्या मते, मीडल एज म्हणजेच 40 ते 60 वर्षाच्या वयात मासे खाल्ल्याने डिमेंशिया आजारापासून सुटका मिळते. उत्तम त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टी कधी खाता ते महत्वाचे आहे.

रोज खा या गोष्टी

20 वर्षाच्या वयात एनर्जीसाठी तुमच्या डाएटमध्ये आयरनयुक्त पदार्थांचं सेवन करा. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामध्ये आयरनचं प्रमाण फार जास्त आहे. उदा. वाटाना, बेक्ड बीन्स, शेंगदाणे, अक्रोड, अंडी, ब्रेकफास्ट सीरियल आणि मासे.

पोटाच्या आरोग्यासाठी आठवड्यातून तीन वेळा खा या गोष्टी

दह्यामध्ये काही प्रमाणात बॅक्टेरिया असतात. पोटाच्या आरोग्यासाठी ते फार लाभदायक ठरतात. सोबतच इम्युनिटी आणि मूड बूस्टअप करण्यासाठीही लाभदायक आहे. यात कॅल्शियमही मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे तुमची हाडे मजबूत होतात.

आठवड्यातून एकदा नट्स खा

नट्समध्ये सेलेनियम असतं. जे तुम्ही सर्दी, ताप आणि व्हायरल इनफेक्शन होण्यापासून तुमचा बचाव करतं. चिकन, अंडे आणि मास्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सेलेनियम असतं.

तीशित या गोष्टींचे सेवन करा

हेल्दी प्रेग्नेंसीसाठी हिरव्या पालेभाज्या खाव्यात. हिरव्या पालेभाज्या आणि नट्समध्ये फॉलेट असते. एक्सपर्ट दररोज आहारात -400 मायक्रोग्राम फॉलिक अॅसिड घेण्यास सांगतात.

Health Tips
Fish Health Tips : रोज मासे खाण्याचे भरमसाठ फायदे; या आजारावर आहे गुणकारी

वाढत्या वयात तरुण दिसण्यासाठी बदाम खा

सूर्यातील यूव्ही किरण स्किन डॅमेज करते. ज्यामुळे तुमच्या फाइन लाइन्स दिसायला लागतात.

चांगल्या झोपेसाठी आठवड्यातून एकदा तरी कॅफिन नसलेली कॉफी प्या

आठवड्यातून एकदा तरी कॅफिनला ब्रेक द्यावा. कॅफिन नसलेल्या चहाचं सेवन करा. कॅफिनचं नियमित सेवन केल्याने नर्वस सिस्टिम डॅमेज होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.