Summer Health Tips: ऋतूंचक्र जसं जसं बदलत जातं तसतसे हवामानातही बदल होत जातो. या बदलत्या हवामानाचा आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असतो.
आयुर्वेदात प्रत्येक ऋतूनुसार Weather Season कश्याप्रकारचा आहार घ्यावा राहणीमानात कोणते बदल करावे याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
आपण अनेकदा बदलेल्या वातावरणानुसार आपल्या जीवनशैलीत Life Style बदल करत नाही आणि आजारांना निमंत्रण देतो. Healthy Life Style and Diet for Summer Season to Keep Fit
जवळपास मार्च ते जून हा वसंत ऋतूचा काळ म्हणून ओळखला जातो. हा काळ वसंत शुद्धीकरणाचा काळ म्हणूनही ओळखला जातो. उपवास करण्यासाठी आणि वजन कमी कऱण्यासाठी हा सर्वाच उत्तम काळ आहे.
हे देखिल पहा-
उन्हाळ्याच्या काळात Summer Season आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. या काळात सर्दी-खोकला तसचं विविध प्रकारच्या अॅलर्जी होण्याचा धोका जास्त असतो.
या बदललेल्या वातावरणात आरोग्याची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी रोजच्या जीवन शैलीत काही थोडेफार बदल केले तरी बदललेल्या तापमानासाठी शरीर तयार राहू शकतं.
थंडीच्या काळात शरीरात तयार झालेला कफ उन्हाळ्यामध्ये सुर्याच्या प्रखर किरणांमुळे वितळण्यास तयार होते. यामुळे कफदोषाशी निगडीत समस्या वाढू लागतात.
सर्दी खोकल्यासोबतच घशात खवखव. टॉन्सिल्स, पचनशक्ती कमी होणे अश्या समस्या उद्भवतात. त्यामुळे या काळात आहाराकडे Healthy Diet खास लक्ष देणं गरजेच आहे.
१. भरपूर पाणी प्या- उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उका़डा आणि घामामुळे शरीरातील पाणी कमी होतं. जास्त डिहायड्रेशन झाल्याने ताप येऊ शकतो. कमी पाणी प्यायल्याने भूक नसली तरी सतत काहीना काही खाण्याची इच्छा होते. यासाठी दररोज किमान सात ते आठ ग्लास पाणी पिणं गरजेच आहे.
२. फळं आणि भाज्या खाणं गरजेचं- सिझनल म्हणजे त्या त्या ऋतूमध्ये उपलब्ध असलेली फळं खाणं हे आरोग्यासाठी कायमच फायदेशीर ठरतं. उन्हाळ्यामध्ये आंबा, संत्री, टरबूज, आलूबुखार, द्राक्ष, जांभूळ आणि कलिंगड अशी बाजारात उपलब्ध असलेली ताजी फळं खाण्यावर भर द्या.
उन्हाळ्यात मिळणाऱ्या मोसंबी संत्री आणि कलिंगडासारख्या फळांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं शिवाय त्यात पोषक तत्वही भरपूर असतात. त्यामुळे तुम्हाला निरोगी राहण्यास मदत होते. त्याचप्रमाणे आहारात भाजीपाल्याचा समावेश करा. दुधी, काकडी, दोडका यांसर भरपूर पालेभाज्या खाल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुधारुन आजारी होण्याची संभावना कमी होते. Eat Fresh Fruits
३. सक्रिय राहणे आणि व्यायम करणे- बदलत्या वातावरणात निरोगी राहण्यासाठी सक्रिय राहणं गरजेचं आहे. त्यासोबतच नियमित व्यायम करणं नक्कीच फायदेशीर आहे. जास्त उष्ण तापमानामुळे अनेकदा ग्लानी येते.
शरीरात कमी एनर्जी असल्यासारखे वाटू लागते आणि काही करण्याची इच्छा होत नाही. शरीरातील मरगळ घालवण्यासाठी सक्रिय राहणं गरजेचं आहे. त्यासोबत रोज सकाळी काही मिनिटं व्यायाम केल्यास संपूर्ण दिवस फ्रेश जातो. काम करण्यासाठी उत्साह निर्माण होतो.
हे देखिल वाचा-
४. स्वच्छता- स्वच्छता आणि तुमच्या आरोग्याचा जवळचा संबध आहे. स्वच्छ मन, स्वच्छ घरं आणि स्वच्छ आहार यामुळे रोगांपासून दुर राहता येत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाढत्या उष्णतेमुळे अन्न पदार्थांमध्ये बॅक्टेरिया जदल गतीने पसरण्याची शक्यता वाढते.
जास्त शिळे अन्न पदार्थ खाल्ल्याने पोटाचे आजार होवू शकतात. त्याचप्रमाणे जास्त तिखट, तेलकट, प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ खाणं टाळावं. नियमित आंघोळ करावी. वेळोवेळी हात पाय धुणे यामुळे त्वचेशी निगडित आजार होण्याची शक्यता कमी होते.
५. योग्य विश्रांती- शरीराला योग्य विश्रांती देणं गरजेचं आहे. शरीराला योग्य विश्रांती दिल्यास आजारी होण्याची शक्यता कमी होते. जागरण न करता पुरेशी झोप घेतल्यास मानसिक स्वास्थ नीट राहतं.
उन्हाळ्यात वातावरण बदलामुळे 'गॅस्ट्रोएन्ट्रायटिस' हा आजार मोठ्या प्रमाणावर पसरतो. यामुळे पोटाचा त्रास होतो. दूषित पाणी आणि अन्नामुळे हा आजार पसरतो यामुळे उघड्यावरील अन्न खाणं टाळावं.
आहाराच ए, सी आणि बी विटामिन असलेल्या तसचं अँडीऑक्सिडन्ट असलेल्या पदार्थांचं प्रमाण वाढवावं. याच ब्लू बेरीज, ब्लॅक बेरीज सोबतच सिझनल फळं म्हणजेच जांभूळ, करवंद, बोरं आणि आवळा हे गोष्टी तुम्ही खाऊ शकतं. Summer Care
कामाशिवाय उन्हात फिरणं टाळा, घरातून बाहेर निघताना सोबत पाण्याची बाटली नक्की घ्या. तसचं उन्हामुळे भोवळ येण्याची शक्यता असते. यासाठी सोबत एखाद चॉकलेट किंवा आंबट गोळ्या, आवळा कॅन्डी ठेवा. बदलत्या हवामानानुसार आधीच योग्य ती काळजी घेतली तर आजारांना दूर ठेवणं शक्य आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.