Curd in winter: हिवाळ्यात दही खावं की नाही? काय सांगतं आयुर्वेद अन् विज्ञान...

दह्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी-12 असतं
Curd in winter
Curd in wintersakal
Updated on

थंडी पडायला सुरवात झाली आहे. ऋतूत जसा बदल होतो तसा आहारात सुद्धा बदल करणे आवश्यक असते. दही हे सर्वांनाच आवडते. पण हिवाळ्यात म्हणजेच थंडीच्या दिवसांमध्ये दही खावं का? हा प्रश्न निर्माण होतो कारण दही हे थंड आहे त्यामुळे हिवाळ्यात दही खावं की नाही? आज आपण या विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. (healthy lifestyle can we eat curd in winter what ayurveda and science say read story ndj97)

दही हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दह्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी-12 आणि रिबोफ्लेविन असतात. याशिवाय दही हा प्रोबायोटिक्स आणि फॉस्फरसचाही चांगला स्रोत आहे.

आयुर्वेद काय म्हणतं?

हिवाळ्यात दही खावं की नाही याविषयी आयुर्वेद हिवाळ्यात दही न खाण्याचा सल्ला देतात कारण दही हे थंड असतं. हिवाळ्यात सर्दीसारखे आजार होऊ शकतात. जर तुम्हाला आधीच सर्दी असेल तर दही खाऊ नये. यामुळे शरिरावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

विज्ञान काय म्हणतं?

मेडीकल सायंसच्या मते हिवाळ्यात दही खाणे आरोग्यासाठी उत्तम आहे. दह्यात खूप प्रकराचे विटामिन्स आणि मिनरल्स असतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात. जर तुम्ही दही जेवणात खायचा विचार करत असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठीही अधिक फायदेशीर आहे. दही हे इम्युनिटी बूस्टरचं काम करतं पण रात्री दही खाऊ नये असा सल्लाही मेडीकल सायंस देते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.