Cold Remedies : हिवाळ्यात सर्दी खोकला ही जरी साधारण गोष्ट असली तरी वारंवार होणारी सर्दी डोकेदुखी असते. अशावेळी डॉक्टरांकडे जाऊनही काहीही फायदा होत नाही. वारंवार होणाऱ्या या सर्दीवर काय उपचार घ्यावे, हेच कळत नाही पण तुम्ही जर काही घरगुती उपाय केले तर त्याचा चांगला फायदा तुम्हाला होऊ शकतो.
चला तर जाणून घेऊया कोणते घरगुती उपाय फायदेशीर ठरेल. (healthy lifestyle cold home remedies winter season )
1, गरम पाणी
ज्यांना सर्दीचा वारंवार त्रास होतो, त्यांच्यासाठी गरम पाणी हे खूप फायदेशीर ठरेल. त्यासाठी थंडीच्या दिवसात पाणी उकळून ठेवावेत. गरम पाणी पिल्याने सर्दीचा त्रास कमी होतो आणि याशिवाय पोटाशी संबंधित इतर समस्या देखील कमी होतात.
2. वाफ घ्या
सर्दी झाल्यास तुम्ही गरम पाण्याची वाफ देखील घेऊ शकता. गरम पाण्याची वाफ घेताना त्यामध्ये थोड्या प्रमाणात व्हिक्स मिसळला तर त्यानंतर व्हिक्स मिश्रीत पाण्याची वाफ घ्या. तुम्हाला आराम मिळेल.
3. काळी मिरी
काळी मिरी ही खूप उष्ण असतात ज्यामुळे वारंवार सर्दी होण्याचा त्रास कमी होतो. जर तुम्ही दररोज काळी मिऱ्याची पावडर आणि तुळसीची पाने खाल्ली तर तुमचा कायमचा सर्दीचा त्रास दूर होऊ शकतो. सोबतच चहामध्ये देखील तुम्ही तुळसीची पाने आणि काळ्या मिऱ्याचा उपयोग केला तर अधिक फायदेशीर ठरेल.
मिठाचे पाणी
सर्दीचा त्रास असणाऱ्या लोकांनी दररोज काळे मिठ खाल्ले पाहिजे. काळ्या मिठामुळे सर्दीचा त्रास कमी होतो. तसेच काळे मीठ कोमट पाण्यात टाकून त्याच्या गुळण्या कराव्यात त्याने देखील सर्दीला आराम मिळतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.