Hemoglobin Low : हिमोग्लोबिनची कमतरता आहे? गोळ्या खाऊ नका तर हे घरगुती खाद्यपदार्थ खा

हिमोग्लोबिनची कमतरता घालवण्यासाठी कोणते खाद्यपदार्थ खायला हवे, या विषयी जाणून घेऊया.
How to Increase Hemoglobin
How to Increase Hemoglobinsakal
Updated on

How to Increase Hemoglobin : दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण अनेकदा स्वत:च्या आरोग्याकडे खूप कमी लक्ष देतो. अशात हिमोग्लोबिनची कमतरता अनेक लोकांमध्ये दिसून येते.

हिमोग्लोबिनची कमतरता म्हणजे रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होणे ज्यामुळे शरीरातील रक्ताला ऑक्सिजन मिळण्यास कठीण होते आणि आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो.

अनेकदा हिमोग्लोबिनची कमतरता जाणवल्यामुळे आपण डॉक्टरांच्या सल्लाने अनेक गोळ्या खातो पण त्याचा तात्पूरता फायदा होतो अशावेळी गोळ्या खाण्याऐवजी तुम्ही घरगुती पोषक आहार किंवा खाद्यपदार्थ खाल्ले तर तुमचा नेहमीचाच त्रास कमी होणार.

हिमोग्लोबिनची कमतरता घालवण्यासाठी कोणते खाद्यपदार्थ खायला हवे, या विषयी जाणून घेऊया.

How to Increase Hemoglobin
Weight Loss : वेट लॉस करणाऱ्यांनी नाश्त्यात बिनधास्त खावे आप्पे
  • बीटामध्ये फोलेटचे प्रमाण सर्वाधिक असते ज्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. शंभर ग्रॅम बीटामधून जवळपास 0.8 मिलीग्रॅम लोह असते त्यामुळे बीट आवर्जून खावे.

  • हिमोग्लोबिनसाठी टोमॅटो हा सुद्धा एक उत्तम स्त्रोत आहे. टोमॅटोमध्येही 0.8 मिलीग्रॅम लोह असते. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी जर आहारात भरपूर टोमॅटोचा वापर केला तर हिमोग्लोबिनची कमतरता झटक्यात दूर होणार.

  • सुकामेवातूनही शरीराला मुबलक असे हिमोग्लोबिन मिळू शकते.

How to Increase Hemoglobin
Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? बिनधास्त लोणचं खा...
  • याशिवाय खजूर आणि खारीकही हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यास मदत करतं. अशक्तपणा कमी करण्यासाठी खजूर आवर्जून खाल्ले जातात. खजूरमध्येही लोहाचे 0.8 मिलीग्रॅम लोहाचे प्रमाण असते.

  •  दररोज एक चमचा मध कोमट पाण्यात घेतल्यास रोग प्रतिकारशक्ती वाढते याशिवाय शंभर ग्रॅम मधामध्ये 0.4 ग्रॅम लोहाचे प्रमाण असते ज्यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता दूर होऊ शकते.

  • हिरव्या पाले भाज्याचा विचार केला तर पालक मध्ये 0.4 ग्रॅम लोहाचे प्रमाण असते जे हिमोग्लोबिन वाढण्यास मदतशीर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.