सकाळचा नाश्ता आपल्या आहारातला सर्वात मोठा घटक आहे. दिवसभराच्या एनर्जीसाठी सकाळचा नाश्ता हा परफेक्ट आणि भरपूर हवाच. सकाळी सकाळी नाश्ता केल्याने आपलं मेटाबोलिझम चांगलं राहातं. शरीर उत्साही राहातं मात्र जर आपण सकाळचा नाश्ता टाळला तर याचे अनेक दुष्परिणाम दिसून येतात. (healthy lifestyle if you avoid morning breakfast increase more risk of heart attack read report)
दिवसभराच्या फास्ट लाईफस्टाईलमुळे अनेकजण सकाळचा नाश्ता करणे टाळतात तर काही वजन कमी करण्याच्या नादातही सकाळचा नाश्ता करत नाही. पण हे चुकीचं आहे. सकाळच्या नाश्ता न केल्याने वजन कमी होत नाही. हा गैरसमज सर्वात आधी दूर करायला हवा.
आज आम्ही तुम्हाला सकाळचा नाश्ता टाळला तर आपल्यावर काय परिणाम होतो याविषयी सांगणार आहोत. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
काय सांगतो 'हा' रिपोर्ट
प्रिवेन्टिव कार्डिओलॉजीच्या यूरोपीय जर्नल 'द फाइंडिग्स'मध्ये प्रकाशित एका रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा करण्यात आलाय. सकाळचा नाश्ता टाळणाऱ्या लोकांना अकाली मृत्यूचा धोका अधिक असतो, असे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहेत. विशेषत: हार्ट अटॅकचा धोकाही वाढतो, असंही समोर आलंय.
रिपोर्टनुसार चुकीच्या खाण्याची सवयी, जेवणाची किंवा नाश्त्याची चुकीची वेळ ही कारणे याला कारणीभूत आहे.
या रिपोर्टनुसार हार्ट अटॅक येऊन गेलेल्या 113 रुग्णांवर अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात असे दिसून आले की सकाळी नाश्ता न करणारे 58 टक्के तर रात्रीचं जेवण उशीरा करणारे रुग्ण 51 टक्के रुग्ण होते तर 48 टक्के रुग्णांमध्ये दोन्ही सवयी होत्या. म्हणजेच जेवण आणि नाश्त्याच्या चुकीच्या सवयीने आरोग्यावर चुकीचा परिणाम होतो, याचं हे उत्तम उदाहरण.
सकाळचा नाश्ता 8:30 पर्यंत करावा. सकाळच्या नाश्त्यात जास्तीत जास्त प्रोटीन, फायबरयुक्त पदार्थ, फळे आणि पौष्टीक असं खावं. तुम्ही साधारणत: ओट्स, उपमा, इडली, डोसा, पोहे (कमी प्रमाणात ), आप्पे, इत्यादी खाऊ शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.